म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 6बजाज ऑटो लिमिटेडने त्यांची लोकप्रिय स्पोर्ट्स टूरिंग मोटरसायकल डोमिनार ४०० आणि डोमिनार २५० बाजारात लॉन्च केली आहेत. अपडेटनंतर या मोटारसायकलमध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक फीचर्स देण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या राइड्ससाठी या मोटारसायकल आरामदायी आहेत.2 / 6कंपनीने डोमिनार ४०० ची एक्स-शोरूम किंमत २ लाख ३८ हजार ६८२ रुपये निश्चित केली. तर डोमिनार २५० ची एक्स-शोरूम किंमत १ लाख ९१ हजार ६५४ रुपये आहे. हे दोन्ही मॉडेल देशभरातील बजाज शोरूममधून खरेदीसाठी उपलब्ध आहेत.3 / 6नवीन डोमिनार ४०० मध्ये आता राइड-बाय-वायर टेक्नोलॉजी मिळत आहे. यासोबतच, रोड, रेन, स्पोर्ट आणि ऑफ-रोड असे ४ रायडिंग मोड देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून रायडरला वेगवेगळ्या परिस्थितीत सुरक्षितपणे मोटारसायकल चालवता येईल.4 / 6नवीन डोमिनार २५० मध्ये चार एबीएस राईड मोड्स देण्यात आले आहेत, जे मेकॅनिकल थ्रॉटल बॉडीपासून चालतात. कंपनीने अपडेटेड २०२५ डोमिनार मॉडेलला एक परिपूर्ण टूरिंग मशीन म्हणून सादर करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.5 / 6आता या मोटरसायकलमध्ये नवीन बॉन्डेड ग्लास एलसीडी स्पीडोमीटर, पुन्हा डिझाइन केलेले हँडलबार, जीपीएस माउंटसह कॅरियर आणि प्रगत नियंत्रण स्विच अशा अनेक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे लांबचा प्रवास आणखी सोपा होईल.6 / 6डोमिनार ४०० मध्ये ३७३.५ सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन पूर्वीप्रमाणेच ४०पीएस पॉवर आणि ३५ एनएम टॉर्क जनरेट करते. यावेळी ही मोटारसायकल कॅन्यन रेड कलर पर्यायासह बाजारात दाखल झाली आहे.