नव्या बाइकच्या पहिल्या सर्व्हिसिंगपर्यंत का वाढवू नये स्पीड? 99% लोकांना माहीतच नाही...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 22:30 IST2024-12-10T22:22:06+5:302024-12-10T22:30:10+5:30
...खरे तर, यामागे काही तांत्रिक कारणे आहेत, जी वाहनांच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची असतात. तर जाणून घेऊयात...

नव्या बाइकची पहिली सर्व्हिसिंग होईपर्यंत वेग मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. खरे तर, यामागे काही तांत्रिक कारणे आहेत, जी वाहनांच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची असतात. तर जाणून घेऊयात...
नव्या बाइकच्या इंजिनमध्ये पिस्टन, सिलेंडर, गियर आणि इतर काही भाग आपसात व्यवस्थितपणे जुळलेले नसतात. यामुळे सुरुवातीच्या 1,000 ते 1,500 किलोमीटरपर्यंत, इंजिनच्या पार्ट्सचे घर्षण कमी करण्यासाठी ब्रेक-इन प्रक्रिया होते.
अधिक स्पीडने बाइक चालवल्यास, हे पार्ट्स व्यवस्थित पणे एकमेकांसोबोत फिट हऊ शकत नाहीत. यामुळे इंजिन लवकर खराब होण्याची शक्यता असते.
नव्या बाइकमध्ये वापरण्यात आलेले इंजिन ऑईल नव्या इंजिन पार्ट्समधील घर्षण कमी करते आणि घाण एकत्रित करते. बाइक अधिक वेगाने चालवल्यास इंजिनवरील दबाव वाढतो आणि ऑयलचे कार्य योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये हे ऑईल बदलून स्वच्छ आणि प्रभावी ऑईल टाकले जाते.
पूर्ण पणे सेट नसल्याने नव्या बाइकचे इंजिन अधिक गरमही होऊ शकते. अधिक वेगाने हे ओव्हरलोड होऊन इंजिनच्या कुलिंग सिस्टिम आणि इतर पार्ट्सनाही नुकसान पोहोचू शकते.
गिअरबॉक्स आणि क्लच प्लेट्सदेखील नव्या असतात. त्या योग्य पद्धतीने फिट होण्यासाठी सामान्य स्पीड आणि लोडची आवश्यकता असते. या मुळे नव्या बाइकची स्पीड अधिक वाढवल्याने यांची लाइफही कमी होऊ शकते. यामुळे बाइक 40 ते 60 किमी/ताशी वेगाने चालवायला हवी.