Left Hand Drive Vs Right Hand Drive: अनेक देशांत उजव्या बाजुला, काही देशांत डाव्या बाजुला स्टेअरिंग का असते? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 08:55 AM2021-11-18T08:55:44+5:302021-11-18T09:10:01+5:30

Left Hand Drive and Right Hand Drive main reason: वर्ल्ड स्टँडर्ड वेबसाईटनुसार जगातील 35 टक्के लोकसंख्या डाव्या बाजुने गाडी चालविते. याच्या मागे ऐतिहासिक कारणे आहेत. तेव्हाच्या राजघराण्यांची. जाणून घ्या इंटरेस्टिंग कारणे.

जगातील सर्व देशांममध्ये वेगवेगळे वाहतुकीचे नियम असतात आणि नागरिकांना त्याचे पालन कराने लागते. पण जेव्हा इतर देशांतील लोक दुसऱ्या देशात जातात तेव्हा त्यांना तेथील नवीन किंवा उलटे नियम समजणे कठीण जाते. असाच एक नियम आहे तो गाडी चालविण्याचा.

जगातील अनेक देशांमध्ये लोक रस्त्याच्या डाव्या बाजूने (Why Some Countries Drive on Left) गाडी चालवतात तर काहींमध्ये कार उजव्या बाजुने चालवली जाते (Why Some Countries Drive on Right?). पण ड्रायव्हिंगमध्ये एवढा फरक का आहे, याचे उत्तर तुम्हाला माहीत आहे का?

काहीदेशांमध्ये उजवीकडे स्टेअरिंग असते तर काही देशांमध्ये भारतासह डावीकडे स्टेअरिंग असते. परदेशातील लोक भारतात आले तर त्यांना इथे गाडी चालविणे कठीण जाते. तर भारतातील लोक परदेशात गेले तर त्यांना तिथे गाडी चालविणे कठीण जाते. (Left hand Drive, Right hand Drive)

वर्ल्ड स्टँडर्ड वेबसाईटनुसार जगातील 35 टक्के लोकसंख्या डाव्या बाजुने गाडी चालविते. यापैकी बहुतांश लोक अशा देशांमध्ये राहतात, जेव्हा पूर्वीच्या काळी तिथे ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटिशांच्या काळापासून डाव्या बाजुने गाडी चालविणे प्रचलित आहे. यामागचे कारणही हैरान करणारे आहे.

हे इंग्रज डाव्या बाजुने कार का चालवायचे? भारतात उजव्या बाजुला स्टेअरिंग का असते? चला जाणून घेऊया.

पूर्वीच्या काळी जेव्हा राजा रजवाड्यांचे राज्य असायचे तेव्हा तलवारबाज रस्त्याच्या डाव्या बाजुने चालायचे. असे अशासाठी असायचे कारण अधिकतर तलवारबाज हे उजव्या हाताने तलवारबाजी करायचेय यामुळे त्यांना डाव्याबाजुला म्यान केलेली तलवार खेचण्यास सोपे जायचे.

यामुळे अचानक हल्ला झाला तर लगेचच उजव्या हातात शस्त्र येत होते. जर ते अशावेळी उजव्या बाजुने चालत असते तर लढाईवेळी स्वत:ला त्या पवित्र्यात आणण्यासाठी वेळ लागला असता.

दुसरे कारण म्हणजे जुन्या काळातच नाही तर आजही घोडेस्वार डाव्या बाजूने घोड्यावर स्वार होतात. कारण त्यांच्या डाव्या बाजुला तलवार लटकत असायची. यामुळे उजव्या बाजुने स्वार व्हायचे झाल्यास तलवार अडकायची. यामुळे सोयीचे म्हणून घोडेस्वारही डाव्या बाजुनेच चालायचे.

आणखी एक बाब म्हणजे, राणी एलिझाबेथच्या काळात फक्त शाही घराण्याच्या लोकांनाच डाव्या बाजुने चालण्याची मुभा होती. अन्य सामान्य लोकांना उजव्या बाजुने चालावे लागायचे. हे सारे लक्षात घेतले तर कार किंवा कोणतेही वाहन ब्रिटिशांच्या काळात डाव्या बाजुने का चालविण्यास सुरुवात झाली हे लक्षात येते.

युरोपमध्ये अठरावे शतक मोठी क्रांती घेऊन आले. एलिझाबेथ आणि शाही परिवाराचा नियम मोडण्यात आला. 1789 मध्ये फ्रेंच क्रांती झाली, तेव्हा जनतेला मोठी ताकद मिळाली. या जनतेने राजघराण्याला सामान्य जनतेसारखेच उजव्या बाजुने चालण्यासाठी सक्ती केली.

जर एखादा व्यक्ती किंवा व्यापारी, श्रीमंत डाव्या बाजुने जात असेल तर त्याच्यावर राजघराण्याचा समजून हल्ले होऊ लागले. यामुळे आपली ओळख लपविण्यासाठी श्रीमंत लोकही उजव्या बाजुने जाऊ लागले. यानंतर वाहनांची स्टेअरिंग व्हीलदेखील वेगवेगळ्या बाजुला बनविण्यात येऊ लागली.

ज्या देशांमध्ये फेंच लोकांच्या कॉलनी होत्या त्या देशांनी उजव्या बाजुने गाडी चालविण्याची पद्धती स्वीकारली. तर काही ब्रिटिश राजवटीतील लोकांनी देखील डावी बाजू सोडून उजव्या बाजुने वाहतूक स्वीकारली.

टॅग्स :कारcar