देशात एवढे टोल, सर्वाधिक पैसा कोणत्या रस्त्याने गोळा केला? IRB ने गल्ल्याच्या आकडा जारी केला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:03 IST2025-01-27T18:00:02+5:302025-01-27T18:03:01+5:30
महाराष्ट्रात सर्वाधिक टोलचे रस्ते आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. याद्वारे सरकारची मोठी कमाई होत असते.

टोल द्या प्रवास करा, हे आता ब्रीदवाक्यच म्हणावे लागणार आहे. कारण आता प्रमुख राज्ये, शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर टोल आकारला जात आहे. मुंबई-पुणे असुदे, दिल्ली-लखनऊ असुदे... राज्यांतर्गत प्रवासासाठीही आता चकाचक सिमेंटचे रस्ते करून त्यावर टोल लावला जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक टोलचे रस्ते आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. याद्वारे सरकारची मोठी कमाई होत असते.
देशात एवढे टोल रस्ते आहेत. कोणता रस्ता जास्त टोल कमवतो, गल्ला जमवतो असा प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती असायला हवे. काही दिवसांपूर्वी तर देशभरातील २०० टोलवर डुप्लिकेट सॉफ्टवेअर बनवून कित्येक कोटी रुपयांचा घपला केला गेला ते समोर आले होते.
आता एवढे करूनही जर करोडोंत पैसे गोळा होत असतील तर मग कोणता रस्ता जास्त महसूल मिळवून देतो ते देखील पहावे लागेल. आपल्या देशात तीन महत्वाचे एक्स्प्रेस वे आहेत. तसेच मुंबई-पुणे, समृद्धी आणि लखनऊ असे १२-१३ एक्स्प्रेस वे आहेत.
वाहनांची विक्री जसजशी वाढत चाललीय तसतसा या टोल प्लाझांचा गल्लाही भरत चालला आहे. दुसरीकडे हे टोलचे दरही दरवर्षी ५-१० टक्क्यांनी वाढविले जात आहेत. आयआरबीने डिसेंबर २०२४ चे आकडे जारी केले आहेत.
आकडेवारीनुसार देशात टोल वसुलीत १९ टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ते एकूण ५८० कोटी रुपये एवढा टोल जमा झाला. डिसेंबर २०२३ मध्ये टोल कलेक्शन ४८८ कोटी रुपये होते. पुढील जी आकडेवारी आहे ती केवळ डिसेंबर महिन्याची आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने सर्वाधिक १६३ कोटी रुपयांचा टोल गोळा केला. डिसेंबर २०२३ मध्ये १५८.४ कोटी रुपये कलेक्शन होते.
दुसरा क्रमांक अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवे या एनएच ४८ चा लागतो. या टोल रस्त्यांनी ७०.७ कोटी रुपये महसूल गोळा केला.
चित्तोडगड ते गुलाबपुरा या राष्ट्रीय महामार्ग ७९ ने ३३.३ कोटी रुपयांची कमाई केली. उदयपूर ते श्यामलाजी या राष्ट्रीय महामार्ग ४८ ने डिसेंबर २०२४ मध्ये २७.६ कोटी रुपये गोळा केले.