शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

FASTag खरेदी करायचाय? जाणून घ्या मनातील समज गैरसमज...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 12:57 PM

1 / 11
आता FASTag वापरणे सर्वच वाहनांना बंधनकारक करण्यात आले आहे. ही एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी आहे. FASTag सेव्हिंग अकाऊंट किंवा डिजिटल वॉलेटला जोडता येते.
2 / 11
फास्टॅगद्वारे (FASTag) टोल नाक्यांवरील रांगांमधून लवकर मुक्ती मिळते असा सरकारचा दावा आहे. यामध्ये काही त्रुटी देखील आहेत. त्या दूर केल्या तर फास्टॅग फायद्याचा ठरणार आहे.
3 / 11
आता हा फास्टॅग कोणत्या कंपनीचा घ्यावा, कुठे लावावा, कार विकल्यावर फास्टॅग ट्रान्स्फर करता येतो का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत. चला जाणून घेऊया याची उत्तरे.
4 / 11
बाजारात वेगवेगळ्या बँकांनी फास्टॅग आणले आहेत. यामध्ये पेटीएम, एसबीआय, आयसीआयसीआय, कोटक, एचडीएफसीसारख्यांचे फास्टॅग आहेत. तुम्हाला जो सोईस्कर आहे तो फास्टॅग घेऊ शकता. पण लक्षात असुद्या...फास्टॅग सोप्या पद्धतीने रिचार्ज करता यायला हवा.
5 / 11
पेटीएम वॉलेटमध्ये पैसे अॅड केले की टोल नाक्यावर आपोआप फास्टॅगमधून पैसे कापले जातात. सुरुवातीला पेटीएमच्या फास्टॅगला खूप समस्या होत्या. तुमची गाडी दारात उभी असताना तुमच्या वॉलेटमधून दुसऱ्याच राज्याच्या टोल नाक्यावर पैसे कापले जात होते.
6 / 11
फास्टॅग टोल नाक्यांवर, बँकांच्या वेबसाईटवर, वेगवेगळ्या पीओएस आणि ई कॉमर्स वेबसाईटवरूनही खरेदी करता येतो. गुगल प्ले स्टोअरवर My FASTag अॅप डाऊनलोड करता येते. यावरूनही फास्टॅग खरेदी करता येऊ शकतो.
7 / 11
FASTag खरेदी करताना कागदपत्रांची गरज लागणार आहे. यामध्ये वाहनाचे आरसी बुक, मालकाचा फोटो, आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ आदी कागदपत्रे द्यावी लागतात.
8 / 11
हो टोल प्लाझावर फास्टॅग खरेदी करता येतो. टोल प्लाझावर दोन्ही बाजुला फास्टॅग विक्रीचे पीओएस असतात. हे पेटीएम किंवा अन्य कंपन्यांचे असू शकतात. माय फास्टॅग अॅप डाऊनलोड करून माहिती भरल्यानंतर फास्टॅग अॅक्टिव्हेट करता येतो.
9 / 11
नाही. फास्टॅग हा कारच्या नंबरवर असतो. हा नंबरही युनिक असतो. यामुळे टोल नाक्यांवरून जात असताना पुढील स्क्रीनवर तुमच्या वाहनाचा नंबर दिसतो.
10 / 11
वाहन विकल्यास फास्टॅग नवीन मालकाला वापरता येत नाही. जरी तुम्ही तो फास्टॅग कारवरच ठेवला तर तुमच्याच अकाऊंटमधून पैसे कापले जातात. यामुळे वाहन विकताना फास्टॅग काढलेला योग्य. फास्टॅग हस्तांतरणीय नाही.
11 / 11
FASTag कधीही एक्स्पायर होत नाही. यामुळे यावर टाकलेला बॅलन्सदेखील एक्स्पायर होत नाही. तुमची कार बरेच दिवस टोल नाक्यावर गेली नाही तरीही त्याचा काहीही फरक फास्टॅग सस्पेंडवर होत नाही.
टॅग्स :Fastagफास्टॅगcarकारPaytmपे-टीएमSBIएसबीआयhdfc bankएचडीएफसीICICI Bankआयसीआयसीआय बँकMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेtollplazaटोलनाका