बाईक प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Yamaha RX 100 लवकरच होणार लाँच, जाणून घ्या कंपनीने काय सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 04:05 PM2023-06-28T16:05:59+5:302023-06-28T16:11:48+5:30

Yamaha RX 100 कंपनीने पहिल्यांदा १९८५ मध्ये लाँच केली होती. ही बाईक भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय होती पण १९९६ मध्ये ती बंद करण्यात आली.

तुमचा जन्म जर नव्वदच्या दशकात झाला असेल तर तुम्हाला यामाहाची RX 100 बाईक माहित असणारच. मोठ्या आवाजात दिसालया एकद स्टायलीश असणारी ही बाईक. या बाईकची आजही क्रेझ कायम आहे. अजुनही अनेकांकडे ही बाईक आहे.

१९९६ रोजी सरकारने वाहनांसाठी लागू केलेल्या नवीन नियमांनंतर ती बाईक बंद करण्यात आली असली, तरी अनेक दशकांनंतरही लोकांमध्ये या बाइकची क्रेझ कायम आहे.

Yamaha RX100 नवीन अवतारात लॉन्च झाल्याच्या बातम्या येतच राहतात, पण स्वत: कंपनीने पहिल्यांदाच लाँचबद्दल माहिती दिली.

एका अहवालानुसार, यामाहा इंडियाचे चेअरमन इशिन चिहाना यांनी Yamaha RX100 बद्दल बोलताना सांगितले की, "ही बाईक भारतासाठी खूप खास आहे, तिची स्टाइल, हलके वजन, पॉवर आणि आवाज यामुळे ती लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. कारण जेव्हा ही बाईक भारतात लाँच करण्यात आली तेव्हा ती टू-स्ट्रोक इंजिनने सुसज्ज होती.

"आता ही बाईक फोर-स्ट्रोक मॉडेल म्हणून लॉन्च करण्यासाठी, किमान 200 सीसी इंजिन वापरावे लागेल आणि या सर्व गोष्टींचा समावेश करणे कठीण आहे, असंही यात म्हटले आहे.

अहवालानुसार, "RX 100 ची क्रेझ बंद करण्याचा आमचा अजिबात हेतू नाही, त्यामुळे जोपर्यंत आम्हाला खात्री होत नाही की आम्ही योग्य कामगिरीसह एक चांगली आणि हलकी बाईक तयार करू शकतो, तोपर्यंत आम्ही ती लॉन्च करणार नाही.

सध्याच्या लाईनसह -अप, 155cc पुरेसे नाही." कंपनीकडून ही बाईक लॉन्च करण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारण्यात आलेली नसली तरी नजीकच्या भविष्यात तुम्ही या बाईक राईडचा आनंद घेण्याचा विचार करत असाल तर तसे अजिबात नाही. यामाहा यावर काम करत आहे आणि जेव्हा बाईक येईल तेव्हा ती उच्च कार्यक्षमता इंजिनद्वारे समर्थित असेल जी 200 सीसी पेक्षा मोठी असेल.

ऐंशीच्या दशकाचा मध्य होता आणि भारत स्वतंत्र होऊन जवळपास ३८ वर्षे उलटून गेली होती. यामाहा मोटरने १९८५ मध्ये जॉइंट-व्हेंचर म्हणून भारतात पदार्पण केले. यादरम्यान यामाहाने एस्कॉर्ट्स लिमिटेडच्या सहकार्याने आरएस आणि आरडी फॅमिली बाईकसह आरएक्स १०० लाँच केले.

या बाईकने बाजारात येताच खरेदीदार आणि चाहत्यांचा एक नवा वर्ग तयार केला. हा तो काळ होता जेव्हा एंग्री यंग मॅन आणि गार्डिस यांच्याशी झुंज देत अभिनेता नायक बनण्याची कहाणी सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर निर्माण होत होती. बॉलीवूड चित्रपटांमध्येही या बाईकचा वापर मोठ्या प्रमाणात झाला होता. बाईक स्क्रीनवर कोणतीही असली तरी पार्श्वभूमीतून येणारा आवाज हा यामाहा RX 100 चा असायचा.

अलीकडेच दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातही 'RX100' नावाचा चित्रपट बनवण्यात आला. RX100 ने हलक्या वजनाची आणि अष्टपैलू बाईक असल्यामुळे बरीचशी चर्चा केली. या बाइकमध्ये कंपनीने फक्त ९८ सीसी क्षमतेचे टू-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन वापरले आहे. जे 11 bhp पॉवर आणि १०.३९ Nm टॉर्क जनरेट करत होते. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले होते. १०३ किलो वजनाची ही बाईक १०० किमी प्रतितास वेगाने धावायची.