Yamaha नं आणल्या दोन Electric Cycles; 28 KMPH चा टॉप स्पीड आणि ऑफ रोड राईडसारखे भन्नाट फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 02:22 PM2022-03-07T14:22:23+5:302022-03-07T14:25:33+5:30

Yamaha Electric Cycles : पाहा काय आहेत फीचर्स आणि किती आहे किंमत.

Yamaha Electric Cycles : यामाहानं (Yamaha) आपल्या दोन इलेक्ट्रीक सायकल्सवरून (Electric Cycles) अखेर पडदा उठवला आहे. या सायकल्सला त्यांनी वाबाश आरटी (Wabash RT) आणि क्रॉसकोर आरटी (CrossCore RC) असं नाव दिलंय.

ही दोन्ही मॉडेल्स कंपनीच्या न्यू मिंट पीडब्ल्यू सीरिज एसटी मिड ड्राईव्ह मोटरसोबत येतात. या मोटर्सच्या मदतीनं रायडर्सना 28 KMPH चा टॉप स्पीड मिळतो.

सध्या भारतासह अनेक देशांमध्ये इलेक्ट्रीक सायकल्सचं क्रेझ वाढत आहे. याशिवाय कमी अंतर कापण्यासाठी लोक या सायकल्सचा वापरही करत आहेत. वाबाश आरटी सायकलमध्ये कंपनीनं ऑफरोड रायडिंगसाठी फीचर्स दिलेत. याशिवाय यात पेडलही देण्यात आलंय.

इलेक्ट्रीक सायकल्स ना केवळ छोट्या अंतराच्या प्रवासासाठी चांगल्या आहेत, तर आरोग्यासाठीही त्या लाभदायक आहेत, असं कंपनीचं म्हणणं आहे. सर्वात प्रमुख कारण हे पर्यावरणात प्रदुषण पसरवत नाहीत. याशिलाय अनेक बाबींमध्ये या सायकल्स उपयोगी पडत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

या सायकल्समध्ये ५०० वॅट क्षमतेची पीडब्ल्यू सीरिज मोटर देण्यात आलीये. याशिवाय यात चार लेव्हल पेडल असिस्टंटसोबत येते. याचा टॉप स्पीड २८ किमी प्रतितास असू शकते. तर किंमतीबाबत सांगायचं झालं तर Wabash RT ची किंमत ४०९९ डॉलर्स म्हणजे जवळपास ३,१४,९३६ रुपये आहे. तर CrossCore RC ची किंमत ३,०९९ डॉलर्स म्हणजेच २,३८१०३ रुपये आहे. (सर्व फोटो - yamahabicycles.com)