Top 5 Upcoming Cars: Maruti Fronx ते Lamborghini Urus S...; एप्रिल महिन्यात लॉन्च होणार या खास कार! तुम्हीही बघतच रहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 01:24 PM2023-03-28T13:24:21+5:302023-03-28T13:32:07+5:30

जाणून घेऊयात, लॉन्च होणाऱ्या टॉप-5 कारसंदर्भात...

एप्रिल महिन्यात अनेक कार लॉन्च होण्यासाठी तयार आहेत. यांत मारुतीच्या नव्या SUV-क्रॉसओव्हर पासून ते Lamborghini Urus S पर्यंत, अनेक लक्झरी कारचा समावेश आहे. तर जाणून घेऊयात, लॉन्च होणाऱ्या टॉप-5 कारसंदर्भात

Maruti Fronx : मारुतीची फ्रोंक्स एप्रिलच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात लॉन्च होऊ शकते. बलेनो-बेस्ड क्रॉसओव्हरला ऑटो एक्सपो 2023 मध्ये शोकेस करण्यात आले होते. हिची बुकिंगही सुरू आहे. या कारची किंमत जवळपास 8 लाख रुपयांपासून सुरू होई शकते. Fronx या कारला 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आणि 1-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

MG Comet EV ही कार एप्रिलमध्ये लॉन्च होऊ शकते. हिची किंमत जवळपास 9 लाख रुपयांच्या जवळपास सुरू होऊ शकते. हिच्या एंट्री-लेव्हल व्हेरिअंटमध्ये 17.3kWh चा बॅटरी पॅक मिळू शकतो. जो साधारणपणे 200kms एवढी रेन्ज ऑफर करू शकतो. तसेच, हिच्या हाय-एंड व्हेरिअंटमध्ये 26.7kWh चा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो.

Lamborghini Urus S: फेसलिफ्टेड उरुस एप्रिलमध्ये बाजारात येऊ शकते. ही कार एस व्हेरिअंटमध्ये सादर केली जाईल. या कारमध्ये 4.4-लिटर ट्विन-टर्बो V8 (666PS) इंजिन मिळेल. हीकार केवळ 3.7 सेकंदांत 0-100 किलोमीटर प्रति तास एवढा वेग घेऊ शकते.

Mercedes AMG GT S E Performance: ही कार भारतात एप्रिलमध्ये डेब्यू करू शकते. ही 4-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनसह येईल. जी 639PS आणि 900Nm टार्क जनरेट करू शकते. तसेच, हिचे हायब्रिड सेटअप 843PS आणि 1470Nm टार्क जनरेट करू शकते.

Lexus New Gen RX: ही अपकमिंग D2-सेगमेंट SUV एप्रिल महिन्यात येऊ शकते. हिची किंमत 1 कोटी रुपयांपासून ते 1.15 कोटी रुपयांपर्यंत असू शकते.