Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:05 IST2025-10-27T16:00:44+5:302025-10-27T16:05:42+5:30

Mid-Size SUVs Under 20 Lakh: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये मिड साइज एसयूव्ही कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

मिड साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये सध्या मोठी स्पर्धा आहे आणि भारतीय बाजारात अनेक दमदार पर्याय उपलब्ध आहेत.

₹२० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत एक सुरक्षित, स्टाइलिश आणि मायलेज देणारी एसयूव्ही शोधत असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

मारुती व्हिक्टोरिस: मारुती सुझुकीची ही अलीकडेच लाँच झालेली एसयूव्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने खूपच खास आहे. या एसयूव्हीला ग्लोबल एनसीएपीकडून ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. तिची सुरुवातीची किंमत ₹१० लाख ४९ हजार ९०० (एक्स-शोरूम) आहे. यामध्ये सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे.

ह्युंदाई क्रेटा: ह्युंदाई मोटर्सची क्रेटा ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मिड-साईज एसयूव्हीपैकी एक आहे. क्रेटा पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा तीनही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, ₹१० लाख ७२ हजार ५८९ रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत ही एसयूव्ही १.५-लिटर इंजिनसह येते.

किया सेल्टोस: किया मोटर्सची सेल्टोस ही बाजारात ह्युंदाई क्रेटाची सर्वात मोठी स्पर्धक मानली जाते. तिच्या स्पोर्टी आणि आकर्षक डिझाइनमुळे ही कार तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सेल्टोसची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹१० लाख ७९ हजार २७६ (एक्स-शोरूम) आहे आणि ती विविध इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.

टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर: टोयोटाची विश्वासार्हता असलेली ही एसयूव्ही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. या मिड साइज एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹१०.९४ लाख (एक्स-शोरूम) आहे. या एसयूव्हीची खास गोष्ट म्हणजे, तुम्हाला यामध्ये सीएनजी आणि हायब्रिड तंत्रज्ञानाचा पर्याय मिळतो, ज्यामुळे मायलेज खूप चांगले मिळते.

मारुती ग्रँड विटारा: मारुती सुझुकीची प्रीमियम एसयूव्ही असलेल्या ग्रँड विटाराचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात लांब कारपैकी एक आहे. ₹२० लाखांच्या बजेटमध्ये ही कार खरेदी करू शकता. यातही तुम्हाला सीएनजी आणि हायब्रिडचे उत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहेत.