या पाच चुका इलेक्ट्रिक कारला करू शकतात राख, या पाच चुका पडू शकतात महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:58 IST2025-01-23T13:49:07+5:302025-01-23T13:58:02+5:30
Electric Car: विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार नुकत्याशा रुळत आहेत. चालवण्यास अगदी कमी खर्च आणि थेट प्रदूषण होत नसल्याने त्या लोकप्रिय ठरत आहेत. मात्र इलेक्ट्रिक कारची अंतर्गत रचना ही बरीच गुंतागुंतीची असल्याने त्या चालवण्यास अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत. त्यामुळे ही वाहनं वापरताना खूप खबरदारी घ्यावी लागते. इलेक्ट्रिक कारबाबत थोडीशी जरी बेफिकिरी बाळगली तरी ती आगीचा गोळा बनू शकते. त्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक कार हाताळताना खालील खबरदारी घेणं आवश्यक ठरतं.

विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार नुकत्याशा रुळत आहेत. चालवण्यास अगदी कमी खर्च आणि थेट प्रदूषण होत नसल्याने त्या लोकप्रिय ठरत आहेत. मात्र इलेक्ट्रिक कारची अंतर्गत रचना ही बरीच गुंतागुंतीची असल्याने त्या चालवण्यास अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत. त्यामुळे ही वाहनं वापरताना खूप खबरदारी घ्यावी लागते. इलेक्ट्रिक कारबाबत थोडीशी जरी बेफिकिरी बाळगली तरी ती आगीचा गोळा बनू शकते. त्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक कार हाताळताना खालील खबरदारी घेणं आवश्यक ठरतं.
आवश्यकतेपेक्षा अधिक चार्जिंग
इलेक्ट्रिक कारची बॅटरी १०० टक्क्यांहून अधिक चार्ज करणे टाळा. वारंवार फूल चार्ज केल्याने बॅटरीची लाईफ कमी होते. ८० टक्क्यांपर्यंत चार्जिंग करणं पुरेसं ठरतं. त्यामुळे आग लागण्याचा धोका उरत नाही.
चुकीच्या चार्जरचा वापर
कार चार्जिंग करण्यासाठी देण्यात आलेल्या ओरिजनल चार्जरचा वापर करा. इतर चार्जरचा उपयोग केल्याने बॅटरीचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आग लागू शकते.
आवश्यकतेपेक्षा अधिक उष्णता किंवा थंड ठिकाणी कार पार्क करणे टाळा
इलेक्ट्रिक कारला थेट उन्हामध्ये किंवा खूप थंड ठिकाणी पार्क करू नका. तापमानामध्ये अचानक झालेला बदल हा बॅटरीवर परिणाम घडवून आणू शकतो. अशा परिस्थितीत आग लागू शकते.
वेगात गाडी चालवणे टाळा
इलेक्ट्रिक कार वेगाने चालवल्याने बॅटरीचा वापर अधिक होतो. त्यामुळे तिचं आयुर्मान कमी होतं. हळूहळू गाडी चालवल्याने बॅटरीचं आयुर्मान वाढतं.
रेग्युलर मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंग न करणे
इलेक्ट्रिक कारची नियमितपणे सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे. वेळोवेळी टायरचा प्रेशर तपासून घेतला पाहिजे. तसेच ब्रेक पॅड्स बदलून घेतले पाहिजेत. याबाबत लक्ष ठेवून तुमच्या इलेक्ट्रिक कारचं आयुष्य वाढू शकतं. तसेच सुरक्षित ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.