शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Automobile: ‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत कार ब्रँड; कोणत्या कंपनीची किती कमाई?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 12:58 PM

1 / 10
नवी दिल्ली: जागतिक स्तरावर अनेकविध कंपन्या कार निर्मिती क्षेत्रात किंवा ऑटोमोबाइल क्षेत्रात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. काही कंपन्यांनी तर अद्यापही भारतात आपली उत्पादने सादर केलेली नाहीत.
2 / 10
ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रिजने यासंदर्भात एक अहवाल सादर केला असून, यामध्ये सन २०२० च्या आढाव्यानंतर जागतिक स्तरावर कोणत्या कंपन्या टॉप ५ च्या यादीत आहे, याची माहिती दिली आहे.
3 / 10
जगातील सर्वाधिक व्हॅल्युएबल ऑटोमोबाइल कंपन्यांच्या यादीत Toyota ने Mercedes-Benz वर मात केली आहे. यासोबतच टोयोटा आता जगातील सर्वात श्रीमंत ऑटोमोबाइल कंपनी ठरली आहे.
4 / 10
ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रिजच्या रिपोर्टनुसार, टोयोटाची ब्रँड व्हॅल्यू २०२० मध्ये ५८,०७६ दशलक्ष डॉलर होती, ती आता वाढून ५९ हजार ४७९ दशलक्ष डॉलर झाली आहे.
5 / 10
Toyota कंपनी जगातील सर्वांत श्रीमंत ऑटोमोबाइल कंपन्यांच्या यादीत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. कंपनीने मर्सिडीज बेंझला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले असून, यासोबतच जगातील सर्वांत मोठी ऑटोमोबाइल कंपनी बनली आहे.
6 / 10
Mercedes-Benz या कंपनीची एकूण ब्रँड व्हॅल्यू २०२१ मध्ये कमी होऊन ५८ हजार २२५ दशलक्ष डॉलर झाली आहे. मर्सिडीज बेंझची गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये ब्रँड व्हॅल्यू ६५,०४१ दशलक्ष डॉलर होती.
7 / 10
Volkswagen ची ब्रँड व्हॅल्यू २०२१ मध्ये वाढली असून आता ४७,०२० दशलक्ष डॉलर इतकी त्यांची ब्रँड व्हॅल्यू झाली आहे. मागील वर्षी कंपनीची ब्रँड व्हॅल्यू ३३ हजार ८९७ दशलक्ष डॉलर होती.
8 / 10
BMW ही कंपनी आरामदायी वाहनांसाठी जगभरात लोकप्रिय आहे. या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू २०२१ मध्ये ४० हजार ४४७ दशलक्ष नोंदवण्यात आली. तर, गेल्या वर्षी बीएमडब्ल्यूची ब्रँड व्हॅल्यू ४० हजार ४८३ दशलक्ष डॉलर होती.
9 / 10
Porsche कंपनीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्येही वर्ष २०२१ मध्ये वाढ झाली आहे. २०२१ मध्ये ३४ हजार ३२६ दशलक्ष डॉलरसह ही कंपनीला टॉप ५ मध्ये स्थान मिळवण्यात यश मिळाले आहे.
10 / 10
गेल्या वर्षी २०२० मध्ये Porsche ची ब्रँड व्हॅल्यू ३३ हजार ९११ दशलक्ष डॉलर होती. यानंतर टेस्ला, होंडा, फोर्ड, व्होल्वो, ऑडी या कंपन्या अनुक्रमे ६ ते १० क्रमाकांवर आहेत.
टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगToyotaटोयोटाMercedes Benzमर्सिडीज बेन्झVolkswagonफोक्सवॅगनBmwबीएमडब्ल्यूAudiआॅडीHondaहोंडाHyundaiह्युंदाईTeslaटेस्ला