Join us  

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

१ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा काल केली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 7:42 PM

Open in App

T20 World Cup 2024 - १ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा काल केली गेली. १५ प्रमुख खेळाडू आणि ४ राखीव खेळाडू अशा एकूण १९ खेळाडूंच्या नावाची घोषणा BCCI ने केली. इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा साखळी सामन्यांचा टप्पा २१ मे रोजी भारतीय संघाची पहिली तुकडी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अमेरिकेला रवाना होईल.  २६ मेनंतरदुसरी तुकडी अमेरिकेला रवाना होईल. वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या पहिल्या तुकडीत कोणकोण खेळाडू असतील यांची नावे समोर आली आहेत. 

भारतीय संघाचे लीग सामने न्यूयॉर्कला होणार आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड येथे होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान ( ९ जून), अमेरिका ( १२ जून) व कॅनडा ( १५ जून)  असे भारताचे सामने होणार आहेत. आयपीएल २०२४च्या प्ले ऑफसाठी पात्र न ठरलेल्या संघातील खेळाडू ज्यांची वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ते २१ मे रोजी अमेरिकेला रवाना होतील. 

आयपीएल संघनिहाय भारतीय संघातील खेळाडूंची वर्गवारी केल्यास मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह हे चार खेळाडू आहेत. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( विराट कोहली, मोहम्मद सिराज), राजस्थान रॉयल्स ( संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल), चेन्नई सुपर किंग्स ( रवींद्र जडेजा, शिवम दुबे), दिल्ली कॅपिटल्स (रिषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल) आणि पंजाब किंग्स (अर्शदीप सिंग) या फ्रँचायझीचे खेळाडू आहेत 

आयपीएल गुणतालिकेवर लक्ष टाकल्यास मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स हे संघ खालच्या तीन क्रमांकावर आहेत. MI व RCB यांचे प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वर्ल्ड कपसाठीच्या पहिल्या बॅचमध्ये रोहित, हार्दिक, सूर्या, जसप्रीत, विराट, मोहम्मद सिराज हे खेळाडू नक्की असतील. दिल्ली कॅपिटल्स जे सहाव्या क्रमांकावर आहेत, त्यांनाही एक पराभव स्पर्धेबाहेर फेकणारा ठरू शकतो. त्यामुळे रिषभ, कुलदीप व अक्षर हेही २१ मे रोजी अमेरिकेला रवाना होऊ शकतील. पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंगही या बॅचमध्ये असू शकतो. 

भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024आयपीएल २०२४रोहित शर्माविराट कोहली