सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:31 IST2025-09-18T12:25:53+5:302025-09-18T12:31:32+5:30

Tata च्या कारला पैकीच्या पैकी गुण!

Tata Altroz Safety Rating: भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत कार सुरक्षेच्या बाबतीत Tata मोटर्स पुन्हा एकदा आघाडीवर आली आहे. कंपनीची प्रीमियम हॅचबॅक टाटा Altroz फेसलिफ्टने भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. दमदार स्कोर, अॅडव्हान्स फीचर्स आणि परफेक्ट सुरक्षेमुळे अल्ट्रोज पुन्हा एकदा “सेफ्टी क्वीन” ठरली आहे.

5-स्टार रेटिंग मिळवणारी सलग 9वी कार- नवीन अल्ट्रोज ही भारत NCAP कडून टेस्ट केलेली टाटाची नववी कार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत टेस्ट झालेल्या प्रत्येक टाटा कारला 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. याआधी, 2020 मध्ये लॉन्च झालेल्या प्री-फेसलिफ्ट अल्ट्रोजलाही ग्लोबल NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळाली होती.

टेस्टमध्ये कसा दिला परफॉर्मन्स? एडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन (AOP) : 32 पैकी 29.65 गुण आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (COP) : 49 पैकी 44.90 गुण मिळाले. हे आकडे स्पष्ट करतात की, अल्ट्रोज ही कार मोठ्यांसह लहान मुलांसाठीही उत्कृष्ट सुरक्षा देते.

किंमत आणि व्हेरिएंट्स- पेट्रोल व्हेरिएंट : सध्याची सुरुवातीची किंमत ₹6.89 लाख, जी 22 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या GST स्ट्रक्चरनंतर ₹6.30 लाख (एक्स-शोरूम) होईल. CNG व्हेरिएंट : सध्याची सुरुवातीची किंमत ₹7.89 लाख, जी GST सवलतीनंतर ₹7.22 लाख होईल. डिझेल व्हेरिएंट : GST सवलतीनंतर ₹8.09 लाखापासून सुरू.

अल्ट्रोजची वैशिष्ट्ये- इंजिन ऑप्शन्स : 1.2-लिटर पेट्रोल, 1.5-लिटर डिझेल. इतर फीचर्स : 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, स्टायलिश अपहोल्स्ट्री, एअर-कंडिशनिंग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स.

सेफ्टी फीचर्स- सर्व व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग्स, ABS + EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट, यर व्हेरिएंट्समध्ये 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS).