Tata Altroz EV: टाटाची नवी ईलेक्ट्रीक कार, 500 किमीची रेंज देणार; चर्चांचा बाजार गरम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 12:46 PM2021-07-25T12:46:59+5:302021-07-25T12:54:03+5:30

Tata Altroz EV Driving Range, after subsidy Price: टाटाच्या ताफ्यात सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत. एवढ्या कार अद्याप कोणत्याही कंपनीकडे नाहीत. टाटाकडे Tiago EV, Tigor EV आणि लोकप्रिय झालेली Nexon EV आहे.

Tata Altroz EV Expectations: टाटा मोटर्स नेक्सॉन ईव्हीच्या यशानंतर आता भारतीय बाजारात नुकतीच दाखल झालेली , फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगची टाटा अल्ट्रॉझ (Tata Altroz EV ) कार ईव्हीमध्ये लाँच करण्याची तयारी करत आहे. ही देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक कार आहे. (Tata Altroz EV launch soon, see Expected range and price.)

येत्या काही महिन्यात ही कार भारतात लाँच होणार आहे. या कारची रेंज एवढी आहे की अद्याप तेवढ्या रेंजची कार भारतात उपलब्ध नाहीय, अशी चर्चा बाजारात सुरु आहे. (Tata Altroz EV will give Driving range of 500 km in single charge. 12 lakh Price expected: Report )

टाटाच्या ताफ्यात सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत. एवढ्या कार अद्याप कोणत्याही कंपनीकडे नाहीत. टाटाकडे Tiago EV, Tigor EV आणि लोकप्रिय झालेली Nexon EV आहे.

पैकी टियागो आणि टिगॉरची रेंज सध्या 110 किमी एवढी आहे. ती वाढून दुप्पट केली जाणार आहे. तर नेक्सॉन ईव्हीची रेंज ही 310 किमीच्या आसपास आहे. प्रत्यक्षात 250 च्या आसपास रेंज मिळत असल्याचा मुंबईतील वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या ग्राहकांचा अनुभव आहे.

मात्र, आता जी टाटा ईलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे, ती थोडीथोडकी नव्हे तर 500 किमीची रेंज देणार असल्याचे सांगितले जात आहे. Tata Motors Altroz EV च्या उत्पादनासाठी नवीन प्रॉडक्शन लाईन उभारण्याचे काम सुरु झाले आहे.

या कारमध्ये टाटाचे Ziptronic इलेक्ट्रिक पावरट्रेनचा वापर केला जाणार आहे. हीच प्रणाली नेक्सॉन ईव्हीमध्ये वापरण्यात आली आहे. मात्र, नेक्सॉन ईव्हीच्या तुलनेत अल्ट्रॉझमध्ये मोठी बॅटरी देण्यात येणार आहे.

यामुळे या कारची रेंज नेक्सॉनपेक्षा 25 ते 40 टक्के अधिक असणार असल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

महत्वाचे म्हणजे अल्ट्रॉझनंतर कंपनी नेक्सॉन ईव्हीमध्ये देखील नवीन बॅटरी पॅक देण्यास सुरुवात करणार आहे. सध्या यामध्ये 30.2 kWh बॅटरी पॅक मिळते. एकंदरीत अल्ट्रूझची ड्रायव्हींग रेंज ही 450 ते 500 किमीच्या आसपास जाणार आहे.

टाटा अल्ट्रॉझ ईव्ही भारत सरकारच्या FAME-II स्कीममध्ये मिळणाऱ्या सबसिडीमध्ये येणार आहे. तसेच राज्य सरकारांची सबसिडी मिळणार आहे. यामुळे या Tata Altroz EV ची किंमत 12 लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

सबसिडी मिळाली की ही कार 9 ते 10 लाखांवर मिळेल. टाटा या ईव्ही कार चार्ज करण्यासाठी देखील चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या प्रयत्नात आहे.