डिसेंबरमध्ये स्टॉक संपला नाही, आता हजारोंनी डिस्काऊंट वाढला; ग्राहकांच्या 'या' कार्सवर उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 10:31 AM2023-01-05T10:31:39+5:302023-01-05T10:48:44+5:30

सध्या ही कंपनी आपल्या कार्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देत आहे.

कारच्या वाढत्या किमतींदरम्यान रेनॉल्ट इंडियाने ग्राहकांना दिलासा दिला आहे. कंपनी या महिन्यात आपल्या 3 मॉडेल्सवर 60 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनी ज्या मॉडेल्सवर सूट देत आहे त्यात रेनॉल्ट क्विड, रेनॉल्ट ट्रायबर आणि रेनॉ किगर यांचा समावेश आहे.

या गाड्यांना ग्लोबल NCAP कडून 4 स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाले आहे. 31 जानेवारीपर्यंत ग्राहकांना या गाड्यांवर लाभ मिळणार आहे. त्यानंतर ही ऑफर संपेल. डिसेंबरमध्ये या कार्सवर 50 हजारांपर्यंत सूट देण्यात येत होती. म्हणजेच कंपनीने आता स्टॉक क्लिअर करण्यासाठी सूट वाढवली आहे. चला तर मग जाणून घेऊया या सर्व कारवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स.

कंपनी तिच्या सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅक Kwid वर 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये 15,000 रुपयांचा कॅशबॅक, 15,000 रुपयांचा एक्सचेंज आणि 10,000 रुपयांच्या कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे.

याशिवाय तुमचा डीलर तुम्हाला या कारवर अतिरिक्त सवलत देऊ शकतो. म्हणजेच, जर कारचा स्टॉक क्लिअर झाला नाही, तर डीलर त्याच्या बाजूने ही ऑफरमध्ये वाढ होऊ शकते. Kwid ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 464,400 रुपये आहे.

Renault त्याच्या सर्वाधिक लोकप्रिय MPV आणि 7 सीटर कार ट्रायबरवर वर्षअखेरीस 60,000 रुपयांची कमाल सूट देत आहे. यामध्ये 25,000 रुपयांचा कॅशबॅक, 25,000 रुपयांचा एक्सचेंज आणि 10,000 रुपयांच्या कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे.

यावर देखील डीलरकडून या कारवर अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते. ट्रायबरला NCAP कडून 4 स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाले आहे. विशेष म्हणजे या कारची सीट 10 प्रकारे अॅडजस्ट करता येते. या कारची एक्स-शोरूम किंमत 591,800 रुपये आहे.

कंपनीने आपल्या कॉम्पॅक्ट SUV Kiger वरही उत्तम ऑफर आणल्या आहेत. या महिन्यात या कारवर 45 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. ज्यामध्ये 15 हजारांचा कॅशबॅक, 20 हजार रुपयांचा एक्सचेंज आणि 10 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 2 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी समाविष्ट आहे.

ग्लोबल NCAP ने या SUV ला 4 स्टार सेफ्टी रेटिंग देखील दिली आहे. ही कार ॲडव्हान्स्ड आणि कनेक्टेड फीचर्ससह येते. त्या कारच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 599,000 रुपये आहे. एकूणच, ही कार खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.