Splendor vs Shine: दैनंदिन वापरासाठी कोणती बाइक चांगली? GST कपातीनंतर किंमत किती? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:56 IST2025-10-27T12:52:59+5:302025-10-27T12:56:33+5:30
Hero Splendor vs Honda Shine: भारतात Hero Splendor आणि Honda Shine या दोन्ही परवडणाऱ्या कम्यूटर बाइक्स म्हणून प्रसिद्ध आहेत.

भारतात Hero Splendor आणि Honda Shine या दोन्ही परवडणाऱ्या कम्यूटर बाइक्स म्हणून प्रसिद्ध आहेत. 2025 च्या नवीन जीएसटी दरांनंतर या बाइक्सची किंमत आता आणखी कमी झाली आहे. केंद्र सरकारने दोन चाकी वाहनांवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून कमी करुन 18 टक्के केली आहे. त्यामुळे या लोकप्रिय बाइक्स खरेदी करणे ग्राहकांसाठी आणखी परवडणारे झाले आहे.

जीएसटी कपातीनंतर, हिरो स्प्लेंडर एक्सटेकच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किमती अंदाजे ₹7,000 ने कमी झाल्या आहेत, ज्यामुळे त्या आणखी स्वस्त मिळतील. दिल्लीमध्ये स्प्लेंडर एक्सटेक डिस्क ब्रेकची किंमत आता ₹82,300 एक्स-शोरूम झाली आहे. तर, सुपर स्प्लेंडर एक्सटेक ड्रम ब्रेक ओबीडी2बी व्हेरिएंटची किंमत ₹78,618 एक्स-शोरूम झाली आहे.

तसेच, होंडाची लोकप्रिय शाइन 125 पूर्वी ₹85,600 होती, जी जीएसटी कपातीनंतर ₹77,31000 पर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही बाईक्स मध्यमवर्गीयांसाठी आणखी स्वस्त झाल्या आहेत.

हिरो स्प्लेंडर प्लसमध्ये 4-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन असलेले एअर-कूल्ड 4-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर ओएचसी इंजिन आहे. हे इंजिन 8,000 आरपीएमवर 8 एनएम टॉर्क निर्माण करते. ही बाइक फ्युएल इंजेक्शन सिस्टमसह येते. या हिरो बाईकचा टॉप स्पीड 87 किमी प्रतितास आहे.

होंडा शाइनमध्ये 4-स्ट्रोक एसआय, बीएस-VI इंजिन आहे. हे इंजिन 7500 आरपीएमवर 11 एनएम टॉर्क निर्माण करते. या बाईकचे इंजिन 5-स्पीड ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. होंडा शाइनचा टॉप स्पीड 102 किमी प्रतितास आहे.

जर किंमत आणि मायलेजचा विचार केला, तर हिरो सुपर स्प्लेंडर आता अधिक किफायतशीर ठरते. मात्र, होंडा शाइन पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत थोडी पुढे आहे. शाइनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स असल्याने, ती लांब प्रवासासाठी अधिक आरामदायक आहे, तर स्प्लेंडर दैनंदिन शहरातील वापरासाठी उत्तम पर्याय मानला जातो.

















