शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...तर दरवर्षी लाखो जीव वाचणार; नितीन गडकरींचा कार कंपन्यांना मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 6:52 PM

1 / 7
देशात दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोकांचा जीव जातो. निकृष्ट रस्ते, मानवी चुका, वाहनांमधल्या त्रुटी प्रवाशांच्या जीवावर बेततात. अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
2 / 7
अपघात झाल्यानंतर एअर बॅग्स प्रवाशांसाठी कवचकुंडलं ठरतात. एअर बॅग्समुळे अनेकदा भीषण अपघातातून प्रवाशांचे जीव वाचले आहेत. त्यामुळेच गडकरींनी कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे अतिरिक्त एअर बॅग्सचा आग्रह धरला आहे.
3 / 7
लहान कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं पुरेशा एअर बॅग्स असायला हव्यात. कमी उत्पन्न असलेले आणि मध्यमवर्गीय लहान कार खरेदी करतात. त्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घ्यायला हवी, असं मत गडकरींनी व्यक्त केलं.
4 / 7
कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या केवळ श्रीमंतच खरेदी करू शकतील अशा कारमध्येच आठ एअर बॅग्स का लावतात, असा सवाल गडकरींनी उपस्थित केला. श्रीमंतांच्या कारमध्ये ८ एअर बॅग्स देता. मग गरीब खरेदी करत असलेल्या कारमध्ये केवळ २-३ एअर बॅग्स कशा असतात, असा सवाल गडकरींनी कार कंपन्यांना विचारला.
5 / 7
जास्त कर, सुरक्षा आणि प्रदूषण उत्सर्जनाचे कठोर नियम यांच्यामुळे वाहनांच्या किमती वाढत असल्याचा सूर सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रातून उमटत आहे. नेमक्या याच पार्श्वभूमीवर गडकरींनी अतिरिक्त एअर बॅग्सची गरज बोलून दाखवली आहे.
6 / 7
लहान कार मुख्यत: मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्ती खरेदी करतात. अशा व्यक्तींच्या कारमध्ये एअरबॅग्स नसल्यास अपघातात त्यांचा जीव जाऊ शकतो, असं गडकरी म्हणाले.
7 / 7
सर्व वाहन कंपन्यांनी आपल्या सर्व कारमध्ये किमान ६ एअरबॅग्स लावायल्या हव्यात, असा सल्ला गडकरींनी दिला. अतिरिक्त एअर बॅगमुळे कारच्या निर्मितीचा खर्च किमान ३ ते ४ हजारांनी वाढेल. पण आपल्या देशात गरिबाला पूर्ण सुरक्षा मिळायला हवी, असं गडकरींनी म्हटलं.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहन