मार्च मेगा ऑफर; Skoda आपल्या कारवर देतेय ५ लाखांपर्यंत सूट! संधी गमावू नका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:16 IST2026-03-11T13:08:01+5:302026-03-11T13:16:52+5:30
Skoda Car Discount: Skoda ऑटो इंडिया मार्चमध्ये आपल्या कुशाक, स्लाव्हिया, कोडियाक आणि कायलॅकवर बंपर डिस्काउंट देत आहे.

Skoda Car Discount: नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कार कंपन्या आणि डीलरशिपकडून जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Skoda ऑटो इंडियाने मार्च महिन्यात आपल्या SUV आणि सेडान मॉडेल्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. ग्राहकांना कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट स्कीम आणि लॉयल्टी इन्सेंटिव्हच्या माध्यमातून मोठी बचत करण्याची संधी मिळत आहे. विशेषतः मागील वर्षातील (MY२४ आणि MY२५) स्टॉकवर सर्वाधिक फायदे दिले जात आहेत.

मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये लोकप्रिय असलेल्या Skoda Kushaq वर ग्राहकांना मोठी सूट मिळत आहे. Hyundai Creta, Volkswagen Taigun आणि Maruti Grand Vitara यांना टक्कर देणाऱ्या या SUV च्या २०२६ मॉडेलवर सुमारे १.४० लाख रुपयांपर्यंत फायदा मिळत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे. तर MY२५ आणि MY२४ या जुन्या स्टॉकवरील Monte Carlo, Prestige, Sportline आणि Signature या व्हेरिएंट्सवर तब्बल ३ लाख रुपयांपर्यंत बचतीची संधी मिळत आहे.

Hyundai Verna, Honda City आणि Volkswagen Virtus यांना स्पर्धा देणाऱ्या Skoda Slavia सेडानवरही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार २०२६ मॉडेलवर व्हेरिएंट आणि ट्रान्समिशननुसार सुमारे ६०,००० ते ६५,००० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. मात्र जुन्या स्टॉकवरील ऑफर्स अधिक आकर्षक आहेत. MY२४ आणि MY२५ मॉडेल्सवर जवळपास ३ लाख रुपयांपर्यंत बचतीची संधी उपलब्ध आहे.

प्रीमियम SUV सेगमेंटमधील Skoda Kodiaq वर कंपनीने सर्वाधिक सवलत दिली आहे. Sportline व्हेरिएंटवर सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत फायदा मिळत आहे, तर L&K Selection व्हेरिएंटवर सुमारे २.५० लाख रुपयांपर्यंत फायदा मिळतोय. याशिवाय, एंट्री लेव्हल Lounge व्हेरिएंटवर सुमारे १.५० लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

सब-४ मीटर SUV सेगमेंटमधील Skoda Kylaq वरही हजारो रुपयांची सूट दिली जात आहे. या SUV चे स्पर्धक Tata Nexon, Hyundai Venue, Kia Sonet आणि Maruti Brezza आहेत. मिड-स्पेक Signature आणि Signature+ व्हेरिएंटवर सर्वाधिक फायदा मिळत असून ग्राहकांना सुमारे ७५,००० रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. मात्र ऑटोमॅटिक व्हर्जनवर सवलत तुलनेने कमी आहे.

















