Royal Enfield च्या 'या' बाईकला ग्राहकांची सर्वाधिक पसंती; Bullet-Hunter ला मागे टाकले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 05:32 PM2023-10-01T17:32:55+5:302023-10-01T17:38:22+5:30

Royal Enfield Sales: Royal Enfield ने ऑगस्ट 2023 मध्ये देशांतर्गत बाजारात 69,393 युनिट्सची विक्री केली आहे.

Royal Enfield Sales In August 2023: प्रसिद्ध टू-व्हिलर कंपनी Royal Enfield च्या गाड्यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीची झपाट्याने वाढ झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये रॉयल एनफिल्डच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली. कंपनीने देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली कामगिरी केली आहे.

आपण 300cc ते 400cc गाड्यांचा विचार केला, तर रॉयल एनफिल्डने 85% पेक्षा जास्त मार्केट शेअरसह या सेगमेंटवर पूर्णपणे वर्चस्व राखले आहे. गेल्या महिन्यात (ऑगस्ट 2023) एकूण विक्री (देशांतर्गत + निर्यात) 77,412 युनिट्स होती, जी ऑगस्ट 2022 मध्ये विकल्या गेलेल्या एकूण 70,112 युनिट्सपेक्षा जास्त आहे.

Royal Enfield ने ऑगस्ट 2023 मध्ये देशांतर्गत बाजारात 69,393 युनिट्सची विक्री केली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 62,892 युनिट्सच्या तुलनेत हे 6,501 युनिट्स अधिक आहे. टक्केवारीचा विचार केला तर या वर्षी 10.34 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये क्लासिक बाइक्सची सर्वाधिक विक्री झाली. गेल्या महिन्यात कंपनीने या बाईकचे 26,118 युनिट्स विकले. क्लासिक कंपनीच्या विक्री चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये विक्री झालेल्या 18,993 युनिट्सच्या तुलनेत यंदा विक्रीत 37.51 टक्के वार्षिक वाढ झाली आहे. इतकंच नाही तर, RE क्लासिकच्या विक्रीत महिन्या-दर-महिन्यानुसार वाढ झाली आहे. जुलै 2023 मध्ये बाईकची 24,889 युनिट्स विकली गेली. म्हणजेच महिन्या-दर-महिन्यानुसार विक्रीत 4.94 टक्के वाढ झाली आहे.

याव्यतिरिक्त, RE हंटर 350 ची विक्री YoY आणि MoM, दोन्ही आधारावर 14,161 युनिट्सवर घसरली आहे. हे ऑगस्ट 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 18,197 युनिट्सपेक्षा 22.18 टक्के कमी आणि जुलै 2023 मध्ये विकल्या गेलेल्या 17,813 युनिट्सपेक्षा 20.50 टक्के कमी आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये बुलेट 350 ची विक्री वार्षिक आधारावर 65.45 टक्क्यांनी वाढली. ऑगस्ट 2022 मध्ये, विक्री झालेल्या युनिट्सची संख्या 7,618 वरून 12,604 युनिट्सपर्यंत वाढली. MoM विक्री जुलै 2023 मध्ये विकल्या गेलेल्या 5,313 युनिट्सवरून 137.23 टक्क्यांनी वाढली.