दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:51 IST2025-08-01T14:45:47+5:302025-08-01T14:51:42+5:30
या बाईकची Hero च्या लोकप्रिय Xtreme शी स्पर्धा असेल.

Honda Bike: भारतीय बाजारापेठेत CB125 हॉर्नेट आणि शाइन 100 DX लॉन्च केल्यानंतर आता कंपनीने त्यांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. CB125 हॉर्नेटची सुरुवातीची किंमत ₹1.21 लाख (एक्स-शोरूम) आहे, तर शाइन 100 DX ची सुरुवातीची किंमत ₹74,959 (एक्स-शोरूम) आहे.
या दोन्ही बाईकची डिलिव्हरी ऑगस्ट 2025 च्या मध्यापासून सुरू होणार आहे. त्यांची बुकिंग होंडाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करता येईल किंवा तुम्ही होंडा डीलरशिपला भेट देऊन बुक करू शकता.
CB125 हॉर्नेट ही होंडाची 125cc कम्युटर स्पोर्ट सेगमेंटमधील नवीन बाईक आहे. या नवीन बाईकमध्ये शार्प, मस्क्युलर डिझाइन, कव्हर आणि बोल्ड पेंट स्कीम मिळेल. या बाईकमध्ये गोल्डन USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस 5-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक आहे, जे चांगला रायडिंग अनुभव देतात.
या बाईकमध्ये एलईडी लायटिंग सेटअप आहे, ज्यामध्ये DRLs आणि एलिव्हेटेड टर्न इंडिकेटरसह ट्विन एलईडी हेडलॅम्प आहेत. तसेच, ब्लूटूथ होंडा रोडसिंकसह ४.२-इंचाचा TFT डिस्प्ले देखील मिळेल. यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट पाहायला मिळेल. याशिवाय, USB टाइप-सी चार्जर, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि सिंगल-चॅनेल ABS सह फ्रंट डिस्क ब्रेक मिळेल.
CB125 हॉर्नेटमध्ये १२३.९४ सीसी सिंगल-सिलिंडर, फ्युएल-इंजेक्टेड OBD2-इंजिन मिळेल, जे ७,५०० RPM वर ८.२ kW आणि ६,००० RPM वर ११.२ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे ५-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. होंडाचा दावा आहे की ते फक्त ५.४ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास वेग वाढवू शकते, ज्यामुळे ही बाईक या श्रेणीतील सर्वात वेगवान बाईकपैकी एक बनते.
शाइन १०० डीएक्स डिझाइन- ही एक कम्युटर बाईक आहे. अपडेटेड मॉडेलमध्ये क्रोम डिटेलिंगसह नवीन डिझाइन हेडलॅम्प, नवीन इंधन टाकी, नवीन ग्राफिक्स आणि क्रोम अॅक्सेंटसह ब्लॅक-आउट पार्ट्स मिळतात.
याची लांब सीट मागे बसणाऱ्यांसाठी आरामदायी आहे. या बाईकमध्ये डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जे रिअल-टाइम मायलेज, अंतर आणि सर्व्हिस रिमाइंडर्स दर्शवते.
ही बाईक होंडाच्या ईएसपी (एनहान्स्ड स्मार्ट पॉवर) सह ९८.९८ सीसी सिंगल-सिलिंडर, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन बाईक आहे. हे इंजिन ७५०० आरपीएमवर ५.४३ किलोवॅट आणि ५००० आरपीएमवर ८.०४ एनएम टॉर्क जनरेट करते आणि ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.