Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 20:20 IST2025-07-19T20:16:03+5:302025-07-19T20:20:04+5:30

Porsche Cayenne Launched: पोर्शेची केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च झाली आहे.

पोर्शेने त्यांची नवी लक्झरी एसयूव्ही कार केयेनची ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च केली आहे.

पोर्शेच्या या नवीन ब्लॅक एडिशन मॉडेल्सची बुकिंग देशभरातील अधिकृत डीलरशिपवर सुरू झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कारची डिलिव्हरी या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल.

पोर्शेच्या या कारमध्ये हेडलाइट्स, साइड मिरर, विंडो फ्रेम आणि बॅजिंगवर ब्लॅक-आउट घटक आहेत, ज्यामुळे ही कार आणखी आकर्षित दिसत आहे.

या कारचे नाव'ब्लॅक एडिशन' असले तरी या कार पांढरा, कॅरारा व्हाइट मेटॅलिक, डोलोमाइट सिल्व्हर मेटॅलिक, क्वार्टझाइट ग्रे मेटॅलिक, कार्माइन रेड आणि काश्मीर बेज मेटॅलिक अशा रंगांत उपलब्ध आहेत.

वेगळा रंग निवडण्यासाठी ग्राहकांना ७.३० लाख रुपये द्यावे लागणार आहेत. कस्टम रंग निवडल्यास ग्राहकांना त्यासाठी अतिरिक्त २०.१३ लाख रुपये खर्च करावे लागतील.

पोर्शे केयेन ब्लॅक एडिशनची किंमत भारतात १.८० कोटी रुपये आहे.