Petrol, Diesel Price Cut: दिवाळीआधी पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी घट होणार? मोदी सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 03:58 PM2021-10-20T15:58:37+5:302021-10-20T16:06:10+5:30

petrol and diesel price may go down: दोन्ही इंधनाच्या किंमतींमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. पेट्रोलबरोबरच डिझेलनेही आता मोठी वाढ नोंदविली आहे.

Diwali 2021 मध्ये इंधनाच्या किंमतींमध्यो मोठी घट होण्याची शक्यता आहे. कारण सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची कपात करण्यात येणार आहे.

सरकारचे लक्ष्य कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती रोखणे हे आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. या दोन्ही इंधनाच्या किंमतींमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. पेट्रोलबरोबरच डिझेलनेही आता मोठी वाढ नोंदविली आहे.

सुत्रांनी सांगितले की, पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखण्यासाठी उत्पादन शुल्कावर 2 ते 3 रुपये प्रति लीटर कपातीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

पेट्रोलच्या किंमतीत गेल्या जानेवारीपासून 30 ते 35 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत गेल्या जानेवारीपासून 26 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे.

यामुळे सामान्यांच्या खिशाला भोक पडले आहे. इंधन दरवाढीमुळे अन्य वस्तू, पदार्थांचे दरही वाढले आहेत. यामुळे दिवाळीआधी ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

दोन पेट्रोलियम उत्पादनांच्या शुल्कावर कपातीची नव्याने चर्चा करण्यात आली आहे. परंतू अद्याप यावर ठोस निर्णय घेतलेला नाही. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

जर ही कपात लागू केली गेली तर सरकारच्या महसुलामध्ये वर्षाला 25000 कोटी रुपयांची घट होणार आहे. दोन पेक्षा जास्त रुपयांची कपात ही घट 36000 कोटींवर नेऊ शकते. निम्म्याहून अधिक आर्थिक वर्ष संपल्याने यामध्ये कमी अधिक होऊ शकते.

उत्पादन शुल्कात 3 रुपयांची कपात झाल्यास पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत मोठी कपात मानली जाईल. तेल कंपन्यादेखील यामध्ये काही वाटा उचलू शकतात. डिझेल 100 रुपयांखाली आणि पेट्रोल 100 रुपयांच्या आसपास आणण्याचा प्रयत्न आहे.

शुल्कात कपात न केल्यास सरकारला इंधनातून 4.3 लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळू शकतो. बजेटमध्ये 3.2 लाख कोटी रुपये अंदाज लावण्यात आला होता. 2011 मध्येही सरकारला पेट्रोलियम क्षेत्रातून 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला होता.

Read in English