ना पंचरची भीती ना हवेची झंझट, आता वाहनांना दिसणार थर्ड जनरेशन 'AirFree' टायर! अशी आहे नवीन टेक्नॉलॉजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:54 IST2026-02-25T13:45:15+5:302026-02-25T13:54:18+5:30

कंपनीने 'थर्ड जनरेशन एअरफ्री टायर' सादर केले असून, या टायरमध्ये हवा भरण्याची अजिबात गरज भासणार नाही. महत्वाचे म्हणजे, हा टायर उत्पादनासाठीही सज्ज झाला आहे.

सध्या रस्त्यावर गाडी चालवताना टायर पंचर झाला की, दिवस खराब झाला, अशीच भावना सर्वांच्या मनात येते. पण, आता असे वाटणआर नाही. कारण प्रसिद्ध टायर निर्माता कंपनी 'ब्रिजस्टोन'ने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधला आहे. कंपनीने 'थर्ड जनरेशन एअरफ्री टायर' सादर केले असून, या टायरमध्ये हवा भरण्याची अजिबात गरज भासणार नाही. महत्वाचे म्हणजे, हा टायर उत्पादनासाठीही सज्ज झाला आहे.

अशी आहे नवीन टेक्नॉलॉजी... - ब्रिजस्टोनच्या या तिसऱ्या पिढीतील टायरमध्ये 'अ‍ॅडव्हान्स सिम्युलेशन' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे टायर मजबूत आणि लवचिक मटेरीयलपासून तयार करण्यात आले आहे. यामुळे टायर वेगवेगळ्या हवामानत आणि रस्त्याच्या परिस्थिनुसार, उत्तम परफॉर्मन्स देऊ शकते.

एआयचाही करण्यात आला वापर - विशेष म्हणजे, या टायरमध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI) आधारित ऑटोमेटेड लर्निंग सिस्टम आहे, ही सिस्टम टायरचा आकार आणि दाब परिस्थितींनुसार स्वतःहून अ‍ॅडजस्ट करते. यामुळे प्रवाशांना अधिक चांगला आराम आणि सुरक्षितता मिळेल.

ब्लू स्पोक्स आणि सुरक्षा या टायरमध्ये निळ्या रंगाच्या स्पोक्सचा (Blue Spokes) वापर करण्यात आला आहे. हे स्पोक्स रिसायकल होणाऱ्या 'थर्मोप्लास्टिक रेझिन'पासून तयार करण्यात आले आहेत. गाडीचा संपूर्ण भार सहजपणे पेलू शकतात.

रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात हे स्पोक्स स्पष्ट दिसतात, यामुळे सुरक्षितता वाढते. तसेच, ब्रिजस्टोनने असाही दावा केला आहे की, हे स्पोक रस्त्यावरील धक्के कमी करतात.

या टायरची प्रात्यक्षिक चाचणी मार्च २०२४ पासून जपानमधील टोक्यो येथे सुरू आहे. मात्र, सामान्य प्रवासी कार वापरकर्त्यांना थोडा जास्त वेळ वाट पहावी लागू शकते.

कारण, हे टायर्स सध्या व्यावसायिक ट्रक आणि अल्ट्रा-कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित करण्यात आले आहेत. प्रोफेशनल फ्लीट वाहनांमध्ये देखभाल खर्च कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरेल. लवकरच हे एअरलेस टायर्स सामान्य प्रवाशांच्या गाड्यांमध्येही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.