शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:38 IST

1 / 5
टीव्हीएस मोटर्सची इलेक्ट्रिक स्कूटर आयक्यूब मोठी पसंती मिळवली असून ही देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. सलग तीन महिने या स्कूटरची सर्वाधिक विक्री झाली.
2 / 5
आयक्यूबच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी कंपनीने या इलेक्ट्रीक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे, ज्याची बॅटरी क्षमता ३.१ किलोवॅट आहे. ही इलेक्ट्रीक स्कूटर एका चार्जमध्ये १२१ किलोमीटर धावेल.
3 / 5
या इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप स्पीड ८२ किलोमीटर इतकी आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. तसेच फीचर्समध्ये कोणाताही बदल करण्यात आला नाही.
4 / 5
ही इलेक्ट्रीक स्कूटर पांढरा, तपकरी, राखाडी, तांबडा आणि निळ्या अशा पाच रंगामध्ये बाजारात दाखल होईल.
5 / 5
टीव्हीएस आयक्यूबच्या नव्या व्हेरिएंटच्या बेस आणि टॉप मॉडेलची किंमत अनुक्रमे १.०१ लाख आणि १.३१ हजार इतकी आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरची स्पर्धा बाजारात उपलब्ध असलेल्या बजाज चेतकशी असेल.
टॅग्स :scooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर