शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मर्सिडीजची आलिशान V-Class भारतात लॉन्च; टोयोटा वेलफायर अन् लेक्सस LM शी थेट स्पर्धा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 14:35 IST

1 / 7
Mercedes Benz V Class India Launch Details: भारतीय बाजारपेठेत 'लक्झरी ऑन व्हील्स' ची वाढती क्रेझ आणि टोयोटा वेलफायर, लेक्सस एलएम, एमजी एम9 आणि किआ कार्निव्हल सारख्या लक्झरी MPV ची वाढती मागणी लक्षात घेता, मर्सिडीज-बेंझने आपली आलिशान V-Class लॉन्च केली आहे. कंपनीने 2022 मध्ये V-Class सीरिज बंद केली होती, परंतु लक्झरी एमपीव्हीच्या जोरदार मागणीमुळे, आता या कारला रि-लॉन्च करण्यात आले आहे.
2 / 7
मर्सिडीज-बेंझने भारतात व्हॅन सेगमेंटमध्ये उशिरा नाही तर लवकर पाऊल टाकले होते. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात कंपनीने MB100 सिरीज भारतीय बाजारात आणली होती. त्यानंतर 2020 मध्ये मर्सिडीज-बेंझने V-Class Marco Polo सादर केली. आता कंपनी पुन्हा नव्या V-Class मार्फत भारतातील लक्झरी व्हॅन सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
3 / 7
V-Class चे डिझाइन भव्य असूनही मर्सिडीज-बेंझची सिग्नेचर सॉफ्टनेस जपते. अधिक आकर्षक लूकसाठी कंपनीने यामध्ये AMG Line एक्स्टेरियर दिले आहे. समोर ठळक स्टार-पॅटर्न ग्रिल, एलिगंट LED लाइट स्ट्रिप, Multibeam LED हेडलॅम्प्स मिळतात. तसेच, साइड प्रोफाइल पाहिल्यास V-Class चा मोठा आकार लगेच जाणवतो. या कारची एकूण लांबी 5,370 मिमी, रुंदी 1,928 मिमी अन् उंची: 1,880 मिमी आहे. इतका मोठा आकार असूनही, V-Class स्मार्ट आणि प्रभावी दिसते.
4 / 7
भारतात कंपनीने सर्वात मोठे आणि लांब व्हीलबेस असलेले व्हर्जन आणले आहे. या MPV चा व्हीलबेस 3,430 मिमी (अनेक हॅचबॅक कारपेक्षा जास्त) असून, मोठ्या विंडो पॅनल्स 30 टक्के टिंटसह मिळतात. याशिवाय, मागील बाजूस इलेक्ट्रिक स्लायडिंग डोअर्स मिळतात, जे हँडल ओढताच सहज उघडतात. टेलगेटही इलेक्ट्रिक असून, गरज भासल्यास केवळ मागील काच स्वतंत्रपणे उघडता येते.
5 / 7
विशेष म्हणजे, कंपनीने ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजरसाठी आलिशान केबिन दिले आहे. ड्रायव्हर आपल्या सीटवर बसताच लक्झरीचा अनुभव मिळतो. ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजरसाठी इलेक्ट्रिक अ‍ॅडजस्टेबल व व्हेंटिलेटेड सीट्स, प्रशस्त जागा आणि रस्त्यावर स्पष्ट दृष्टी आणि डॅशबोर्डवर दोन मोठे स्क्रीन दिले आहेत. याशिवाय, इन्फोटेन्मेंट सिस्टमसाठी सेंट्रल डिस्प्ले आणि 15 स्पीकर्ससह Burmester ऑडिओ सिस्टम, ज्यामुळे संपूर्ण केबिन ऑडिटोरियमसारखा अनुभव देते.
6 / 7
याशिवाय, ड्रायव्हरच्या हालचालींवर लक्ष ठेवणारा Attention Assist कॅमेरा देण्यात आला असून, थकवा जाणवल्यास तो इशारा देतो. सेंटर कन्सोलमध्ये मागील दरवाजे ऑपरेट करण्यासाठी फिजिकल बटण्स आणि इन्फोटेन्मेंटसाठी टचपॅड दिला आहे. याच्या सीटिंग लेआउटबद्दल बोलायचे झाल्यास, यात 2+2+2 सहा आसनी मांडणी दिली आहे. मागील चार सीट्स रेल्सवर बसवलेल्या, गरजेनुसार पुढे-मागे हलवता येतात, तर लाउंज-स्टाइल सेटअप किंवा सर्व सीट्स फॉरवर्ड-फेसिंग पर्याय मिळतो. गरज असल्यास मागील दोन किंवा सर्व सीट्स काढण्याची सुविधाही उपलब्ध असून, हे काम मर्सिडीज-बेंझ सर्व्हिस स्टेशनवर करता येते.
7 / 7
भारतातील V-Class दोन इंजिन पर्यायांसह मिळते. यात पेट्रोल माइल्ड हायब्रिड, जे 228 bhp + 20 bhp (हायब्रिड सिस्टम) पॉवर जनरेट करते, तर दुसरे डिझेल इंजिन, जे 233 bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, Airmatic सस्पेन्शन सर्व व्हेरियंट्समध्ये देण्यात येणार आहे, जे भारतात या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळेल.
टॅग्स :Mercedes Benzमर्सिडीज बेन्झcarकारToyotaटोयोटाLexusलेक्ससAutomobileवाहन