शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मारुतीची प्रसिद्ध वॅगन आर येतेय...पाहा काय आहेत बदल...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 3:08 PM

1 / 6
मारुती सुझुकी सध्या तिची सर्वाधिक लोकप्रिय कार WagonR ची चाचणी घेत आहे. नव्या वॅगन आर पुढील वर्षीच्या सुरुवातीलाच लाँच केली जाईल. या कराची टक्कर ह्युंदाईच्या नव्या सँट्रो कारसोबत होण्याची शक्यता आहे. सँट्रो कार 23 ऑक्टोबरला लाँच होणार आहे. या पार्श्वभुमीवर WagonR बाबत काही माहिती मिळाली आहे...
2 / 6
मारुती सुझुकीची नवी वॅगन आर सध्याच्या मॉडेलला बदलणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन वॅगनआर सुझुकीच्या हार्टटेक प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. भारतातील मॉडेलही याच प्लॅटफॉर्मवर असण्याची शक्यता आहे. तसेच वॅगन आरसाठी या प्लॅटफॉर्मच्या अद्ययावत प्रणालीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
3 / 6
नेक्ट जनरेशन वॅगन आरमध्ये नवीन एक्सटीरियर डिजाइन आणि इंटीरियर लेआउट मिळेल. बाहेरील रचनेमध्ये क्रोम ग्रिल, प्रोजेक्टर सेटअपसोबत आकर्षक हेडलँप, मोठे बंपर्स आणि अलॉय व्हील असेल. अंतर्गत रचनाही जुन्या मॉडेलपेक्षा आकर्षक असणार आहे.
4 / 6
भारतातील नव्या वॅगन आरचे डिझाईन जपानमध्ये विकल्या जाणाऱ्या कार सारखेच असणार आहे. नव्या वॅगन आरची लांबी 3599 मीमी, रुंदी 1495 मीमी आणि उंची 1670 मीमी असेल. तसेच व्हीलबेस 2400 मीमी असेल.
5 / 6
कीलेस एन्ट्री, टिल्ट टेलेस्कोपिक अॅडजस्टेबल स्टीयरिंग व्हील, अॅटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल आणि रिअर पार्किंग कॅमेऱ्यासह सेन्सर असणार आहेत.
6 / 6
नव्या वॅगन आरमध्ये डॅशबोर्डवर टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम असणार आहे. ज्याद्वारे वॅगन आर प्रिमिअम श्रेणीतील असल्याचे जाणवेल.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन