बजेट फ्रेन्डली आहे 'या' पाच गाड्यांची Maintenance Cost; किंमतही केवळ सव्वातीन लाखांपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:35 AM2022-03-11T10:35:22+5:302022-03-11T11:40:32+5:30

अन्य गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी कारची सर्व्हिस कॉस्ट किंवा मेन्टेनन्स कॉस्टचा अंदाजही ग्राहक आता आधीच घेऊ लागले आहेत. पाहूया कमी सर्व्हिस कॉस्ट असलेल्या बजेटमधील कार्स

भारतीय कार ग्राहक गेल्या काही वर्षांत खूप स्मार्ट झाले आहेत. कार खरेदी करण्यापूर्वी आता अनेक जण रिसर्चही करतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात. कारची सेफ्टी, फीचर्स आणि लूक हे महत्त्वाचे घटक असतात.

असं असलं तरी कारची सर्व्हिस कॉस्ट किंवा मेन्टेनन्स कॉस्टचा अंदाजही ग्राहक आता आधीच घेऊ लागले आहेत. येथे आम्ही तुमच्यासाठी अशा ५ कार्सची यादी घेऊन आलो आहोत, ज्या किमतीत बजेट फ्रेंडली आहेत, तसेच त्यांची मेन्टेनन्स कॉस्टही खूप कमी आहे.

मारुती सुझुकीची ऑल्टो ही कार देशातील सर्वात स्वस्त वाहनांपैकी एक आहे. या कारची किंमत 3.25 लाख ते 4.95 लाख रुपयांपर्यंत आहे. Maruti Suzuki Alto 800 मध्ये 800cc 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 48Ps पॉवर आणि 69Nm टॉर्क जनरेट करते.

यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. Alto 800 ला Android Auto, Apple CarPlay कनेक्टिव्हिटी, पॉवर विंडो आणि कीलेस एंट्री यांसारख्या फीचर्ससह 7-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलाय. त्याची सर्व्हिस कॉस्ट सुमारे 3200 ते 4500 रुपयांपर्यंत आहे.

मारुती सुझुकी वॅगनआरची किंमत 5.39 लाख ते 7.10 लाख रुपये आहे. मारुतीने आता कॉम्पॅक्ट हॅचबॅकला वल्या सेलेरिओ आणि बलेनोच्या 1-लिटर (67PS/89Nm) आणि 1.2-लीटर (90PS/113Nm) ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह सज्ज केलंय.

यात 5-स्पीड MT आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्याय आहेत. या कारची सर्व्हिस कॉस्ट सुमारे 2800 ते 4500 रुपये इतकी आहे.

Hyundai Santro ची किंमत 4.86 लाख ते 6.44 लाख रुपये आहे. या कॉम्पॅक्ट हॅचबॅकमध्ये 1.1-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन (69PS/99Nm) देण्यात आले आहे. हे 5-स्पीड MT आणि पर्यायी 5-स्पीड AMT गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिअर पार्किंग कॅमेरा आणि रिअर एसी व्हेंट्स मिळतात. या कारची सर्व्हिस कॉस्ट सुमारे 3700 ते 4200 रुपये आहे.

Renault Kwid ची किंमत 4.24 लाख ते 5.70 लाख रुपये आहे. ही कार दोन पेट्रोल इंजिनसह येते. यामध्ये 0.8-लिटर (54PS/72Nm) आणि 1-लिटर (68PS/91Nm) हे पर्याय उपलब्ध आहेत. या कारच्या 1-लीटरला पेट्रोल इंजिन व्हेरिअंटमध्ये 5-स्पीड AMT चा पर्याय देखील मिळतो.

यात अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, कीलेस एंट्री, मॅन्युअल एसी आणि रिव्हर्सिंग कॅमेरासह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. या कारची सर्व्हिस कॉस्ट सुमारे 3600 ते 5500 रुपये इतकी आहे.

मारुती सुझुकी स्विफ्टची किंमत 5.90 लाख ते 8.77 लाख रुपयांपर्यंत आहे. नवीन स्विफ्टमध्ये 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 90 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते.

स्विफ्टला 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आलाय. स्विफ्टमध्ये 4.2-इंचाचा कलर ड्रायव्हर डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो एसी आणि एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहे. या कारची सर्व्हिस कॉस्ट सुमारे 3,300 ते 6,000 रुपये आहे.