महिंद्राच्या 'या' लोकप्रिय SUV वर ₹2.20 लाखांची सूट; ऑफर फक्त चार महिन्यांसाठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:24 PM2024-07-10T12:24:41+5:302024-07-10T12:31:07+5:30

Mahindra XUV700 Discount : महिंद्राच्या या SUV ची ग्राहकांमध्ये खुप मागणी आहे.

Mahindra XUV700 AX7 Price Cut: देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्राने त्यांच्या लोकप्रिय SUV XUV700 ला 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक खास ऑफर आणली आहे. कंपनीने या फुल्ली लोडेड रेंज AX7 च्या किमतीत मोठी कपात केली आहे. ग्राहकांना या व्हेरियंटवर 2 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. त्यामुळेच आता या कारची किंमत 19.49 लाख रुपये(एक्स शोरुम) झाली आहे.

मात्र, ही ऑफर मर्यादित कालावधिसाठीच असेल. तुम्हाला महिंद्राची फ्लॅगशिप फीचर्स असलेली SUV XUV700 घ्यायची असेल, तर लवकर बुक करावी लागेल. कारण, कंपनीने आणलेली ऑफर फक्त चार महिन्यांसाठी असेल. महिंद्राने आजपासून(10 जुलै) पुढील चार महिन्यांसाठी या एसयूव्हीची किंमत कमी केली आहे.

Mahindra XUV700 AX7 चे फिचर्स- या कारमध्ये तुम्हाला प्रीमियम फीचर्स मिळतात. यात ADAS Level - 2, Adaptive Cruise Control, Panoramic Skyroof, Airy Ambiance, Dual Acchery Superscreen आणि 12 स्पीकर्ससह 3D ऑडिओ यासारखी अनेक प्रीमियम फिचर्स आहेत.

Mahindra XUV700 AX7 व्हेरिएंटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 6 सीटर मॅन्युअल ट्रान्समिशनची सुरुवातीची किंमत 19.69 लाख रुपये आहे, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 21.19 लाख रुपये आहे. याशिवाय 7 सीटर मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 19.49 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची किंमत 20.99 लाख रुपये आहे.

कंपनीने या कारला 2 नवीन रंगांमध्ये लॉन्च केले आहे. यामध्ये डीप फॉरेस्ट आणि बर्ंट सिएना या रंगांचा समावेश आहे. सेफ्टीसाठी कंपनीने यात 6 एअरबॅग्ससह लेव्हल-2 ADAS फिचर दिले आहे. याशिवाय टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, रिव्हर्स कॅमेरा यासह अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.