Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:09 IST2026-04-09T13:58:42+5:302026-04-09T14:09:41+5:30
Maruti Suzuki Budget Car: इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे बजेटमध्ये बसणारी आणि खिशाला परवडणारी कार शोधत असाल, तर भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकीच्या अशा अनेक कार उपलब्ध आहेत, ज्या मायलेजच्या बाबतीत अव्वल आहेत.

मारुती सुझुकी सेलेरिओ सीएनजी: या यादीत अव्वल स्थानी असलेली सेलेरिओ सध्या देशातील सर्वाधिक इंधन-कार्यक्षम कार मानली जाते. नवीन के सीरिज इंजिनमुळे ही कार ३५.६० किमी/किलो इतके जबरदस्त मायलेज देते. सुरक्षिततेच्या बाबतीतही कंपनीने यात तडजोड केलेली नाही, यात ६ एअरबॅग्जची सुविधा देण्यात आली आहे. या कारची किंमत ५ लाख ९७ हजार ९०० रुपये आहे.

मारुती सुझुकी वॅगन आर सीएनजी: आपल्या डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेली वॅगन आर आजही कुटुंबांची पहिली पसंती आहे. उत्तम लेग-रूम आणि हेड-रूममुळे ही कार लांबच्या प्रवासासाठीही सोयीस्कर आहे. ३४.०५ किमी/किलो मायलेज आणि कमी देखभाल खर्चामुळे ही कार वैयक्तिक व व्यावसायिक अशा दोन्ही वापरासाठी फायदेशीर ठरते. या कारची किंमत ५ लाख ८८ हजार ९०० रुपये आहे.

मारुती सुझुकी अल्टो के१० सीएनजी: ज्यांना पहिल्यांदाच स्वतःची कार घ्यायची आहे, त्यांच्यासाठी ऑल्टो हा सर्वात किफायतशीर पर्याय आहे. ४ लाख ८१ हजार ९०० या आकर्षक किमतीत उपलब्ध असलेली ही कार ३३.८५ किमी/किलो मायलेज देते. शहराच्या गर्दीत चालवण्यासाठी ही अतिशय सोपी आणि विश्वासार्ह कार आहे. या कारची किंमत ४ लाख ८१ हजार ९०० रुपये आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो सीएनजी: जर तुम्हाला छोट्या कारमध्ये एसयूव्हीचा अनुभव हवा असेल, तर S-Presso एक उत्तम पर्याय आहे. तिचे High Ground Clearance खराब रस्त्यांवरून गाडी चालवणे सोपे करते. ही कार ३२.७३ किमी/किलो मायलेज देते आणि तिची किंमत अवघ्या ४ लाख ६१ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते.

मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी: ज्यांना लूक आणि ब्रँड व्हॅल्यू महत्त्वाची वाटते, त्यांच्यासाठी स्विफ्ट CNG उत्तम आहे. इंजिनमधील सुधारणांमुळे ही कार आता अधिक कार्यक्षम झाली आहे. ७ लाख ४४ हजार ९०० रुपये किमतीची ही कार स्टाईल, वेग आणि इंधन बचतीचा एक योग्य संगम आहे.

















