Joy च्या Electric Bikes, Scooters चा बाजारात डंका; विक्रीत २०३६ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 04:02 PM2021-10-07T16:02:23+5:302021-10-07T16:05:56+5:30

Electric Bike, Scooters : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक वाहनांची मागणी सातत्यानं वाढत आहे. बाईक, स्कूटरची रनिंग कॉस्ट केवळ ४० पैसे.

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक वाहनांची मागणी सातत्यानं वाढत आहे. विशेषकरून टू व्हीलर सेगमेंटमध्ये अनेकांचा रस वाढत असल्याचं दिसून आलं आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि सरकारकडून इलेक्ट्रीक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या सब्सिडीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लोक आता इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहेत.

सप्टेंबर महिन्यात आपलं वाहन ब्रँड Joy e-bike च्या अंतर्गत 2500 इलेक्ट्रीक स्कूटर्स, बाईक्सची विक्री केल्याची माहिती वार्डविझार्ड इनोव्हेशननं दिली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विक्री झालेल्या 117 युनिट्सच्या तुलनेत ही विक्री 2036 टक्क्यांनी अधिक असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

इलेक्ट्रीक वाहनांची विक्री वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं वॉर्डविझार्ड इनोव्हेशनचे यतिन गुप्ते यांनी सांगितलं. सध्या प्रत्येक क्षेत्रात इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देण्यात येत आहे. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रीक वाहनांवर देण्यात येणाऱ्या अनुदानामुळेही ही वाढ होत असल्याचं ते म्हणाले.

सध्या कंपनी देशातील २५ शहरांमध्ये आपल्या वाहनांची विक्री करत आहे. तसंच येत्या काळात ही संख्या वाढवण्याची कंपनीची इच्छा आहे.

जॉय ई-बाईकच्या पोर्टफोलिओमध्ये तुफान, थंडरबोल्ट आणि स्कायलाईन सारख्या अनेक हायस्पीड इलेक्ट्रीक बाईक्स आहेत. त्यांचा टॉप स्पीड 90kms प्रति तास आहे. याशिवाय कंपनी इलेक्ट्रीक स्कूटर्सचीदेखील विक्री करते.

ही बाईक सर्वाधिक 25 किलोमीटर प्रति तास वेगानं धावू शकते. तसंच ही बाईक 100 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या बाईकची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी पाच ते साडेपाच तासांचा कालावधी लागतो. याची किंमत 1.56 लाख रूपये आहे.

कंपनीची प्रसिद्ध असलेली बाईक Joy Monster मध्ये कंपनीनं 250W क्षमतेच्या BLDC इलेक्ट्रीक मोटर आणि 72V, 39 AH च्या लिथियम बॅटरी पैकचा वापर केला आहे.

या शिवाय कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Joy Skyline आणि Thunderbolt स्पोर्ट डिझाइनवाल्या बाईक्स आहेत. कंपनीनं यामध्ये DC हबलेस इलेक्ट्रीक मोटरचा वापर केला आहे.

तसंच दोन्ही बाईक्स सर्वाधिक 150 किलोपर्यंत वजन घेऊ शकतात. तसंच या सिंगल चार्जमधघ्ये 110 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देतात.

कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या बाईक्सची रनिंग कॉस्ट केवळ 40 पैसे प्रति किमी आहे. स्कायलाईन ची किंमत 2.29 लाख रुपये आणि थंडरबोल्टची किंमत 2.33 लाख रुपये इतकी आहे.