शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाटानेच नेक्सॉनच्या पायावर 'पंच' मारला! ११ लाखांत Tata Punch EV लाँच; लाँग रेंज तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 1:15 PM

1 / 9
फाईव्ह स्टार रेटिंगच्या एकावर एक अशा कार लाँच करणाऱ्या टाटाने इलेक्ट्रीक मार्केटमध्ये चौथा भक्कम पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. परंतु असे करताना टाटाने आपल्याच नेक्सॉन ईव्हीच्या पायावर पंच मारला आहे.
2 / 9
टाटाने नव्या अॅडजस्टेबल प्लॅटफॉर्मवरील पंच ईव्ही लाँच केली आहे. याची किंमतही टियागो ईव्ही पेक्षा तीन लाखांनी जास्त आणि नेक्स़नपेक्षा तीन लाखांनी कमी अशी ठेवली आहे.
3 / 9
टाटाच्या नेक्सॉन पेट्रोलला देखील पंचने धक्का दिला होता. वर्षभरातच एक लाखाच्यावर पंच विकल्या गेल्या होत्या. तसेच काहीसे आता ईव्हीसोबत होणार आहे. यामुळे नेक्सॉन ईव्हीची विक्री मंदावण्याची शक्यता आहे. Tata PUNCH ev ला दोन बॅटरी पॅकमध्ये लाँच केले आहे.
4 / 9
टाटाची ही सर्वात सुरक्षित फाईव्ह स्टार रेटिंगवाली मिनी एसयुव्ही आहे. या पंचच्या पेट्रोल इंजिनमध्ये एवढा दम दिसत नव्हता, ती कमतरता आता ईलेक्ट्रीक एसयुव्ही दूर करणार आहे.
5 / 9
Tata Punch EV ची सुरुवातीची किंमत 10.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर लाँग रेंजच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 14.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत बॅटरी पॅक आणि व्हेरिअंटनुसार ठरविण्यात आली आहे. या कारची डिलिव्हरी २२ जानेवारीपासून सुरु करण्यात आली आहे.
6 / 9
टाटाची प्युअर ईव्हीसाठी बनविण्यात आलेल्या EV ऑर्किटेक्चर (acti.ev) वर तयार झालेली पहिली कार आहे. यामध्ये गरजेनुसार वेगवेगळे बॅटरी पॅक कमी किंवा वाढविता येतात. पंच ईव्हीमध्ये लाँग रेंजचे तीन ट्रिम आणि स्टँडर्ड रेजचे ५ ट्रिम देण्यात आले आहेत.
7 / 9
कमी रेंजच्या कारची बॅटरी पॅक 25kWh असून एका चार्जवर ही कार 315 किलोमीटर पर्यंत रेंज देते. तर लाँग रेंजसाठी 35kWh बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही कार 421 किलोमीटर पर्यंतची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे.
8 / 9
लाँग रेंजची मोटर 90kW पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करते, तर कमी रेंजच्या कारची मोटर 60kW पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. या एसयूव्हीसोबत ३.३ किलोवॅट क्षमतेचा वॉलबॉक्स चार्जर दिला जाणार आहे.
9 / 9
लाँग रेंजची कार १३ लाखांपासून सुरु होत असून कमी रेंजच्या टॉप व्हेरिअंटची कार १३.२९ लाखाला मिळते. यामुळे १३ लाखांत नेक्सॉनच्या लाँग रेंजच्या व्हेरिअंटपेक्षा थोडी कमी रेंज मिळणार आहे. याचा विचार केला तर ग्राहकांचे जवळपास तीन-चार लाख रुपये वाचणार आहेत.
टॅग्स :Tataटाटाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर