शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंटरनेट कारचे युग धोक्याचे; हॅकर्स घडवू शकतात 9/11 सारखा उत्पात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 3:34 PM

1 / 6
येणारा काळ इंटरनेट कारचा आहे. भारतात वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत अडकलेले असताना केवळ दोनच कारना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आहेत इंटरनेट कार एमजी हेक्टर आणि ह्युंदाई व्हेन्यू. या कारची जोरदार मागणी नोंदविली जात आहे. मात्र, या कारना मोठा धोका आहे. हेक्टरची बुकिंग 28 आणि व्हेन्यूची 50 हजार पार झाली आहे. मात्र, या कारही हॅकिंगची शिकार होण्याची दाट शक्यता वर्तविण्य़ात येत आहे.
2 / 6
या इंटरनेट कारवर हॅकर नियंत्रण मिळवून काहीही उत्पात घडवू शकतात. कंझ्यूमर अॅडव्होकेसी ग्रुपने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात इशारा दिला आहे. या नेक्ट जनरेशन वाहनांना हॅकर्सपासून धोका आहे.
3 / 6
आतापर्यंत स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्माट टीव्ही सारखी उपकरणे हॅक होतात असे आपण ऐकले होते. मात्र, या अहवालामध्ये एका झटक्यात मोठी घटना घडविली जाऊ शकते आणि हजारो लोकांचे प्राण घेतले जाऊ शकतात असा इशारा दिला आहे.
4 / 6
एकट्या अमेरिकेमध्ये पुढील काळात 10 कोटींहून जास्त इंटरनेट कार असणार आहेत. लॉस अँजेलिसच्या कंझ्युमर वॉचडॉग संस्थेने Kill Switch: Why Connected Cars Can Be Killing Machines And How To Turn Them Off या शिर्षकाखाली जाहीर केलेल्या अहवालामध्ये य़ा इंटरनेट कार 9/11 सारखा उत्पात माजवू शकतात. या घटनेमध्ये 3000 लोकांना जीव गमवावे लागले होते.
5 / 6
अहवालानुसार या कार सुरक्षेसाठी धोका उत्पन्न करू शकतात. कंपन्या इंटरनेट कनेक्शन बेस्ड कारमध्ये नवनवीन फिचर लाँच करत आहेत. अहवालामध्ये फोर्डच्या नावाचा उल्लेख करत म्हटले आहे की, त्यांना आणि त्यांच्या व्हेंडरना कारच्या हॅकिंगची कल्पना आहे, मात्र ग्राहकांना याबाबत काहीही माहिती नाहीय.
6 / 6
टेस्लानेही अनेक त्रुटी लपविल्या आहेत. या कारमध्ये ब्लॅक बॉक्स सर्वात महत्वाचा असतो. कार कंपन्यांनाच माहिती नाहीय की जे सॉफ्टवेअर ते वापरत आहेत, ते कुठे विकसित केले जाते. ही सॉफ्टवेअर ओपन सोर्स जसे की अँड्रॉईड, लिनक्स आणि FreeRTOS मध्ये बनविण्यात आली आहेत.
टॅग्स :InternetइंटरनेटcarकारMG Motersएमजी मोटर्सHyundaiह्युंदाई