5 लाख रुपयांपेक्षाही स्वस्त 'या' 7-सीटर कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट, 40000 रुपयांपर्यंत होईल बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:15 PM2021-04-27T13:15:20+5:302021-04-27T13:19:40+5:30

ही कार भारतात विकली जाणारी सर्वात स्वस्त एमव्हीपी (मल्टी परपज व्हेइकल) आहे. आज आम्ही आपल्याला या गाडीवर मिळणाऱ्या सर्व ऑफर्ससंदर्भात माहिती देणार आहोत. याशिवाय आम्ही आपल्याला या गाडीचे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीच्या बाबतीतही माहिती देणार आहोत. (Indias cheapest 7 seater car)

आपण 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची नवी 7-सीटर कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर आपल्यासाठी ही अत्यंत चांगंली संधी ठरू शकते. या एप्रिल महिन्यात देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कारवर 40,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. या कारचे नाव Datsun Go Plus असे आहे. (Indias cheapest 7 seater car datsun go plus getting bumper discount)

ही कार भारतात विकली जाणारी सर्वात स्वस्त एमव्हीपी (मल्टी परपज व्हेइकल) आहे. आज आम्ही आपल्याला या गाडीवर मिळणाऱ्या सर्व ऑफर्ससंदर्भात माहिती देणार आहोत. याशिवाय आम्ही आपल्याला या गाडीचे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीच्या बाबतीतही माहिती देणार आहोत.

या एप्रिल महिन्यात Datsun Go Plus वर काय आहे ऑफर? - कॅश डिस्काउंट - 20,000 रुपयांपर्यंत, एक्सचेन्ज बोनस - 20,000 रुपयांपर्यंत, एकूण डिस्काउंट - 40,000 रुपयांपर्यंत

Datsun Go Plus: परफॉर्मन्स - Datsun Go Plusच्या पावर परफॉर्मन्सचा विचार करता, यात बीएस 6 कम्प्लायंटचे 1.2 लिटरचे 3-सिलेंडर असलेले HR12 DE पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

या कारचे मॅन्युअल ट्रांसमिशन 5000 आरपीएमवर 68 Psची मॅक्सिमम पॉवर आणि 4000 आरपीएमवर 104 Nmचे पीक टॉर्क जनरेट करते.

या कारचे CVT गियरबॉक्स 6000 आरपीएमवर 77 Psची मॅक्सिमम पॉवर आणि 4400 आरपीएमवर 104 Nmचा पीक टॉर्क जनरेट करते.

Datsun Go Plus: डायमेंशन Datsun Go Plusची लांबी 3995 मिलीमीटर, रुंदी 1636 मिलीमीटर आणि ऊंची 1507 मिलीमीटर एवढी आहे. या कारचे व्हीलबेस 2450 मिलीमीटर आणि ग्राउंड क्लिअरन्स 180 मिलीमीटर आहे.

Datsun Go Plus: सस्पेंशन - या कारच्या फ्रंटला McPherson Strut सह लोवल ट्रांसव्हर्स लिंक देण्यात आले आहे. हिच्या रिअरमध्ये ट्विस्ट बीम सस्पेंशनसह क्वॉइल स्प्रिंग देण्यात आली आहे.

Datsun Go Plus: सस्पेंशन Datsun Go Plusच्या फ्रंटला डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. तर हीच्या रिअरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहे.

Datsun Go Plus: किंमत - Datsun Go Plusची सुरूवातीची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 4.25 लाख रुपये आहे. ही किंमत हिच्या टॉप एंड व्हेरिएंटवर 6.99 लाख रुपयांपर्यंत जाते.