Huawei SF5: Smartphone तयार करणाऱ्या कंपनीनं बनवली पहिली Electric SUV; पाहा किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 06:25 PM2021-04-21T18:25:26+5:302021-04-21T18:26:18+5:30

१ हजार किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज आणि पाहा कोणते मिळतायत अधिक फीचर्स

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये आता वाहन उत्पादकांव्यतिरिक्त तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्याही प्रवेश करत आहेत.

दरम्यान, स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणारी आघाडीची कंपनी Huawei नं बुधवारी आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही Huawei SF5 सादर केली. कंपनीने ही कार शांघाय ऑटो शोमध्ये लाँच केली.

Huawei ही चीनमधील एक कंपनी असून दूरसंचार उपकरणं आणि अन्य तंत्रज्ञानासाठी ती प्रसिद्ध आहे.

Huawei आणि Cyrus नं मिळून ही कार तयार केली आहे. ही कार SERES या ब्रॅन्ड अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल.

सध्या ही कार चिनी बाजारात लाँच करण्यात आली आहे. परंतु लवकरच ही कार अन्य बाजारांमध्येही उतरवली जाणार आहे.

या कारच्या साईजबद्दल सांगायचं झालं तर या कारची लांबी 4,700 mm, रुंदी 1,930 mm आणि ऊंची 1,625 mm आहे. याशिवाय या कारमध्ये 2,875 mm चा व्हिलबेस देण्यात आला आहे.

या कारचं डिझाईनही अतिशय आकर्षक आहे. यामध्ये स्वेप्टबॅक हेडलाईटसोबत मेश ग्रिल आणि LED डे टाईम रनिंग लाईट्स देण्यात आले आहे. या कारचं स्लोपिंग रुफ लाईन कारच्या डिझाईनला अधिक आकर्षक बनवतं.

Huawei च्या म्हणण्यानुसार या कारमध्ये देण्यात आलेलं 1.5 लिटर 4 सिलिंडर इंजिन एका जनरेटरप्रमाणे काम करतं, जे बॅटरीला पॉवर देतं.

ही बॅटरी इलेक्ट्रीक मोटर्सशी जोडण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक मोटर आणि इंजिन मिळून एकूण 551PS ची पॉवर आमि 820Nm चा टॉर्क जनरेट करते.

पिक-अपच्या बाबतीही ही कार जबरदस्त असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. केवळ 4.7 सेकंदात ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडू शकते.

Huawei SF5 मध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आले आहेत. तसंच न्यू युरोपियन ड्रायव्हिंग सायकलनुसार ही कार 1000 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते.

एक्स्टेंडरचा वापर केल्यावरच इतकी ड्रायव्हिंग रेंज मिळणअयाची शक्यता आहे. केवळ इलेक्ट्रीकवर ही कार 180 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते.

ही कार एखाद्या बॅटरीप्रमाणेही काम करते. याच्या सहाय्यानं टीव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसना पॉवरही देता येते.

कंपनीनं Huawei SF5 ही कार सध्या केवळ चिनी बाजारात सादर केली आहे. याची किंमत 2,16,800 युआन इतकी निश्चित करण्यात आली आहे.

कंपनीनं Huawei SF5 ही कार सध्या केवळ चिनी बाजारात सादर केली आहे. याची किंमत 2,16,800 युआन इतकी निश्चित करण्यात आली आहे.