Heroचे टेन्शन वाढले; या 2 कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत 455% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 03:21 PM2022-03-08T15:21:35+5:302022-03-08T15:27:28+5:30

भारतात Hero सर्वाधिक इलेक्ट्रीक वाहनांची विक्री करणारी कंपनी आहे. त्यापाठोपाठ 'या' दोन कंपन्यांचा नंबर लागतो.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक नवीन कंपन्या इलेक्ट्रीक व्हेइकलच्या बाजारात दाखल झाल्या आहे.

हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric) ही इलेक्ट्रिक दुचाकींची सर्वाधिक विक्री करणारी कंपनी आहे. मात्र, हिरो इलेक्ट्रिकचे टेन्शन वाढवण्यासाठी दो कंपन्या सज्ज झाल्या आहेत.

या दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रीक दुचाकींच्या विक्रीत वार्षिक 455 टक्के आणि 433 टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळेच हिरो इलेक्ट्रिकचे टेन्शन वाढले आहे.

Rushlane च्या अहवालानुसार, Hero Electric ने गेल्या महिन्यात 7,356 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत हे प्रमाण 235 टक्क्यांनी अधिक आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये कंपनीने 2,194 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या.

आम्ही ज्या दोन कंपन्यांबद्दल बोलत आहोत त्या म्हणजे ओकिनावा (Okinawa) आणि अँपिअर (Ampere). इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत या कंपनीला दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला आहे.

ओकिनावाने फेब्रुवारी 2022 मध्ये 5,923 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली, फेब्रुवारी 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 1,067 युनिटच्या तुलनेत 455 टक्क्यांनी वाढ झाली.

त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावरील अँपिअरने फेब्रुवारी 2022 मध्ये 4,303 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली, जी फेब्रुवारी 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 806 युनिट्सपेक्षा 433 टक्के अधिक आहे.

ओकिनावा एकूण 6 इलेक्ट्रिक स्कूटर विकते. कंपनीच्या ड्युअल 55Ah इलेक्ट्रिक स्कूटर 120 किमी पर्यंतची रेंज देतात. त्याची किंमत 83 हजार रुपये आहे. 200 किलो वजनाच्या लोडिंग क्षमतेसह हे व्यावसायिक वाहन म्हणून वापरले जाऊ शकते.

त्याचप्रमाणे, Ampere ची Magnus EX इलेक्ट्रिक स्कूटर 100 किमी पेक्षा जास्त रेंज ऑफर करते. ही अँटी-थेफ्ट अलार्म, रिमोट की ऍक्सेस आणि एकत्रित ब्रेकिंग सिस्टम यांसारख्या वैशिष्ट्यांसह येते.