Electric Scooter: इलेक्ट्रीक टु व्हीलरच्या मार्गात या आहेत पाच मोठ्या अडचणी; दूर न केल्यास...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:53 AM2021-03-18T11:53:44+5:302021-03-18T12:01:05+5:30

Problems of Electric Scooters, bike Sale: देशात आता हळूहळू इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक लाँच होऊ लागल्या आहेत. नागरिक भीत भीत का होईना या स्कूटर घेत आहेत. हे प्रमाण जरी कमी असले तरीही या इलेक्ट्रीक वाहनांसमोरील संकटे काही कमी नाहीत.

देशात आता हळूहळू इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक लाँच होऊ लागल्या आहेत. नागरिक भीत भीत का होईना या स्कूटर घेत आहेत. हे प्रमाण जरी कमी असले तरीही या इलेक्ट्रीक वाहनांसमोरील संकटे काही कमी नाहीत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती या पेट्रोल वाहनांएवढ्या येतील असे म्हटले आहे. म्हणजेच एकतर जादा किंवा दुप्पट किंमत आणि त्यात खरेदी करताना येणाऱ्या अडचणी आशा गर्तेत पर्यावरण वाचविणाऱी वाहने अडकलेली दिसत आहेत.

इलेक्ट्रीक टूव्हीलरच्या किंमतीतील सर्वात मोठा हिस्सा हा बॅटरी आहे. या बॅटरी जवळपास दोन वर्षांत खराब होऊन जातात.

म्हणजेच आधीच जादा किंमत देऊन स्कूटर घ्यायची आणि नंतर दोन वर्षांनी पुन्हा बॅटरी बदलण्यासाठी भरभक्कम पैसा मोजायचा अशा संकटात ग्राहक सापडत आहेत. मग पेट्रोलपेक्षा परवडणार कशी असा प्रश्न निर्माण होत आहे.

इलेक्ट्रीक स्कूटरची क्वालिटी कशी असेल यावरदेखील ग्राहकांमध्ये चिंता आहे. अनेक स्कूटर या लुना किंवा सनी स्कूटरसारख्या दिसतात. तसेच या स्कूटर मोठमोठ्या कंपन्या नाही तर स्टार्टअप कंपन्या बनवत आहेत.

यामुळे या कंपन्यांवर विश्वास करा ठेवायचा. उद्या ती कंपनी बंद झाली तर काय करायचे यामुळे अनेकजण मनात असूनही इलेक्ट्रीक स्कुटरकडे पाठ फिरवत आहेत. बाजारात सध्या टीव्हीएस, बजाजच्या ई स्कूटर आहेत परंतू त्या सर्वत्र उपलब्ध नाहीत.

स्टीलबर्ड इंटरनॅशनलचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर मानव कपूर यांच्यानुसार सध्या बाजारात इलेक्ट्रीक स्कूटरची मागणी नाहीय. यामुळे या गाड्या खरेदी करताना ग्राहकांना योग्य लोन किंवा फायनान्सचा पर्याय मिळत नाहीय. केंद्र आणि राज्य सरकारांची सबसिडी खरेदीसाठी प्रोत्साहन ठरेल पण पुरेसी नाहीय.

इलेक्ट्रीक स्कूटरचा वापर किंवा खरेदी वाढविण्यासमोर मोठे आव्हान म्हणजे लोकांमध्ये असलेली नकारात्मक भावना आहे. जोपर्यंत त्यांच्या शंका कुशंका दूर होत नाहीत किंवा स्कूटरची रेंज, चार्ज कशी करणार आदी गोष्टी दूर होत नाहीत तोवर हे लोक पेट्रोलच्याच गाड्य़ा खरेदी करतील.

मोठ्या शहरांपेक्षा टूव्हीलर या छोट्या शहरांतच अधिक असतात. यामुळे तिथे इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन, डीलरशीप आणि सर्व्हिसिंग सेंटर मोठ्या प्रमाणावर खोलण्याची गरज आहे. सरकार अद्याप मोठ्या शहरांमध्ये हे उभारू शकलेली नाहीय.

आज देशात 10 पेक्षा जास्त इलेक्ट्रीक स्कूटरचे पर्याय आहेत. एक बाईकदेखील आली आहे. परंतू त्यांचे शोरुमची संख्या आणि कंपनीने केलेली उपलब्धता ही काही मोठ्या मेट्रो शहरांपुरतीच मर्यादित आहे.