दिवाळीनिमित्त ₹1.51 लाखांची बचत; टाटा-मारुतीनंतर Honda ने आणली खास ऑफर, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:34 IST2025-10-13T14:21:45+5:302025-10-13T14:34:02+5:30

GST 2.0 नंतर भारतीय कार मार्केटमध्ये जोरदार उसळी पाहायला मिळत आहे.

GST 2.0 लागू झाल्यानंतर टाटा आणि मारुतीसारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या सर्व गाड्यांच्या किमती कमी केल्या आहेत. याचा परिणाम विक्रीवर दिसून येतोय. किमती घटल्याने गाड्यांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे.

त्यात भर म्हणून, मारुती, टाटा, महिंद्रा आणि ह्युंडाईने GST कपातीबरोबरच दिवाळीनिमित्त बंपर डिस्काउंटची घोषणा केली आहे. आता या स्पर्धेत होंडानेही एंट्री घेतली असून, दिवाळी निमित्त ₹1.51 लाखांपर्यंतच्या ऑफर्स ग्राहकांसाठी आणल्या आहेत.

होंडा अमेझ- होंडाची सर्वाधिक परवडणारी कार ‘होंडा अमेझ’वर ₹98,000 पर्यंत फेस्टिव्ह बोनस मिळतोय. ही कार एक कॉम्पॅक्ट सेडान असून, 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह येते. हे इंजिन 90 BHP ची पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. यात मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक, दोन्ही ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.

होंडा सिटी- होंडाची सर्वात लोकप्रिय होडां सिटीवर ₹1.27 लाखांपर्यंतची ऑफर मिळत आहे. यात 1.5-लीटर i-VTEC पेट्रोल इंजिन आहे, जे CVT आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दोन्ही प्रकारात येते. होंडा सिटीची ओळख तिच्या प्रीमियम इंटीरियर, विस्तृत सीट्स, सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, क्रूज कंट्रोल सारख्या लक्झरी फीचर्ससाठी आहे.

होंडा एलिवेट- हुंडाई क्रेटाशी स्पर्धा करणाऱ्या होंडा एलिवेट वर सध्या सर्वात मोठा ₹1.51 लाखांपर्यंतचा डिस्काउंट मिळतोय. ही नवी कॉम्पॅक्ट SUV अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे आणि सणांच्या काळात तिची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एलिवेटमध्ये 1.5-लीटर i-VTEC पेट्रोल इंजिन आहे, जे 121 BHP पॉवर आणि 145 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार 6-स्पीड मॅन्युअल तसेच CVT ऑटोमॅटिक या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे.

होंडा सिटी हायब्रिड- होंडा सिटी हायब्रिड वर रोख सूट नाही, मात्र कंपनीने ग्राहकांसाठी 7 वर्षांच्या एक्स्टेंडेड वॉरंटी पॅकेजची विशेष ऑफर आणली आहे. मागील उद्दिष्ट हायब्रिड तंत्रज्ञानावरील ग्राहकांच्या शंका दूर करणे आणि दीर्घकालीन विश्वास वाढवणे हे आहे.