शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खूशखबर! नव्या बाईक, कार 40 टक्क्यांनी स्वस्त होणार; नितीन गडकरींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 11:23 AM

1 / 11
केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी जुन्या वाहनांच्या स्क्रॅप पॉलिसीबाबत नवनवीन पैलू उलगडून नवीन वाहन खरेदीदारांना खुशखबर दिली आहे.
2 / 11
जुने वाहन स्वेच्छेने स्क्रॅप पॉलिसीला म्हणजेच दुसऱ्याला न विकता भंगारात काढल्यास नवीन वाहन खरेदी करताना घसघशीत असा 5 टक्क्यांचा डिस्काऊंट दिला जाणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली.
3 / 11
गडकरी यांनी सांगितले की, या स्क्रॅप पॉलिसीमध्ये चार महत्वाचे घटक आहेत. डिस्काऊँटशिवाय प्रदूषण पसरविणारी जुनी वाहनांच्या हरित करावर आणि अन्य शुल्कांची तरतूद करण्यात आली आहे.
4 / 11
जुन्या वाहनांच्या ऑटोमेटेड सुविधा केंद्रांवर फिटनेस आणि प्रदूषण तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही केंद्रे देशभरात सुरु केली जाणार आहेत. यासाठी आम्ही काम करत आहोत.
5 / 11
ऑटोमेटेड सुविधा केंद्रे ही खासगी भागीदारीतून उभारली जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांना मदत करणार आहे. या टेस्टध्ये फेल झालेली वाहने चालविल्यास जबर दंड लावला जाणार आहे. तसेच ही वाहने जप्तही केली जातील.
6 / 11
या पॉलिसीमुळे ऑटो इंडस्ट्रीचा व्यवसाय हा 30 टक्क्यांनी वाढणार आहे. म्हणजेच 10 लाख कोटींवर जाणार आहे. सध्या हा आकडा 4.50 लाख कोटी रुपये आहे. याचबरोबर एक्सपोर्ट कंपोनंट जो आता 1.45 लाख कोटी आहे तो वाढून 3 लाख कोटींवर जाईल, असे गडकरी म्हणाले.
7 / 11
ही स्क्रॅप पॉलिसी जरी अनेकांना चुकीची वाटत असली तरीही तिचे फायदे मोठे आहेत. नितीन गडकरींनी सांगितले यामुळे ऑटो, इन्शुरन्स, सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढणार आहे. ऑटो इंडस्ट्री देशातील सर्वात मोठी रोजगार देणारी इंडस्ट्री ठरणार असल्याचे सांगताना नवीन 50000 नोकऱ्या उपलब्ध होतील, असा दावा त्यांनी केला आहे.
8 / 11
ऑटो सेक्टरमध्ये नवीन वाहन निर्मितीसाठी स्टील, रबर अॅल्युमिनिअम आणि रबर हा आयात करावा लागतो. यामुळे नवीन वाहनांच्या किंमती वाढतात. स्कॅप पॉलिसीमुळे ही गरज भागणार असल्याने याची आयात करावी लागणार नाही. यामुळे वाहनांच्या किंमतीत 30 ते 40 टक्क्यांची घट होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
9 / 11
ही पॉलिसी हरित इंधन आणि इलेक्ट्रीसिटी वाहनांना प्रोत्साहन देणार आहे. यामुळे वाहनांना अद्ययावत तंत्रज्ञानामुळे जास्तीचे मायलेज मिळेल. जे इंधन जुनी वाहने खात होती ते वाचणार आहे. यामुळे 8 लाख कोटी रुपयांच्या कच्च्या तेलातदेखील मोठी घट होणार आहे.
10 / 11
प्रदूषण पसरविणारी जवळपास 1 कोटी वाहने भंगारात जाणार आहेत. यामध्ये 51 लाख हलकी वाहने म्हणजेच कार आणि अन्य हलकी वाहने जसे की स्कूटर, बाईक, रिक्षा आदि 34 लाख वाहने असणार आहेत. ही वाहने अनुक्रमे 20 आणि 15 वर्षे झालेली असणार आहेत.
11 / 11
याशिवाय मध्यम आणि अवजड वाहने जी 15 वर्षे झालेली आहेतस अशी 17 लाख वाहने भंगारात जाणार आहेत, असा नितीन गडकरी यांनी सांगितले.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग