ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:06 IST2025-06-25T14:39:31+5:302025-06-25T15:06:40+5:30

मारुती सुझुकी या वर्षात एसयुव्ही सेगमेंटमध्ये नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कारचे नाव एस्कुडो असू शकते.

कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात SUV चे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, आता मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांसाठी नवीन एसयुव्ही कार लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. या कराचे नाव एस्कुडो नाव असू शकते.

मारुती सुझुकीने या कारला भारतातील ग्राहकांसाठी डिझाईन केले आहे. या कारमध्ये ग्राहकांना नवीन सुविधा देण्यात येणार असून ती मजबूत असणार आहे.

मारुती सुझुकीने गेल्या वर्षी टॉर्कनाडो सोबत एस्कुडो हे नाव नोंदणीकृत केले होते. सुझुकी जपानमध्ये एस्कुडो या नावाने विटारा विकते. आता ते भारतीय बाजारपेठेत एक नवीन मॉडेल म्हणून सादर केले जाऊ शकते, यामध्ये आधुनिक डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानासह प्रिमियम फिचर असू शकतात. ती मारुती सुझुकी अरेना डीलरशिपवर विकली जाऊ शकते.

ही कार ग्लोबल सी प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. ग्रँड विटारा देखील याच प्लॅटफॉर्मवर बनवली आहे. तिला लांब व्हीलबेस मिळू शकतो, यामुळे केबिन स्पेस वाढेल आणि प्रवाशांच्या आरामासाठी हे खूप महत्वाचे आहे.

कंपनी एस्कुडोच्या लूक आणि डिझाइनवर विशेष भर देत असून यात आकर्षक कलरचा पर्याय, एलईडी लाईट्स, मस्क्युलर बंपर आणि इतर फिचर असू शकतात.

मारुती सुझुकीच्या काही दिवसात लाँच होणाऱ्या एसयूव्ही एस्कुडोमध्ये प्रीमियम इंटीरियर, लेदरेट सीट्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले सपोर्टसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सनरूफ, वायरलेस चार्जर, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, ६ एअरबॅग्ज, एबीएस, ईएससी, ३६० डिग्री कॅमेरा आणि इतर अनेक मानक आणि सुरक्षा फिचर असू शकतात.

या कारमध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिन असू शकते, हे सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. हे इंजिन ब्रेझा, ग्रँड विटारा आणि एर्टिगा सारख्या मारुती कारमध्ये देखील आहे.

याशिवाय, ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय असू शकतो. मारुती एस्कुडोचे मायलेज देखील चांगले असू शकते. काही दिवसात या कारची घोषणा होऊ शकते. यावेळीच सर्व माहिती उघड होईल.