शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किया मोटर्सची पहिली कार येतेय; क्रेटा, हॅरिअरला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 4:32 PM

1 / 8
किया मोटर्स भारतात लवकरच पहिली कार सेल्टॉस (Kia Seltos) लाँच करणार आहे. भारतात ही कार ह्युंदाईची क्रेटा आणि टाटाची नुकतीच लाँच झालेली हॅरिअर या कारना टक्कर देणार आहे. या कारच्या लूक आणि बांधणीला कार प्रेमींची पसंती मिळत आहे.
2 / 8
सेल्टॉसची सुरूवातीची किंमत 11.5 ते 12 लाख रुपये एवढी असणार आहे. किंमत क्रेटापेक्षा दोन लाख रुपयांनी जास्त असली तरीही या कारमध्ये दमदार फिचर्स आहेत.
3 / 8
किया मोटर्स या एसयूव्हीमध्ये तीन इंजिनांचा पर्याय देणार आहे. 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल, 1.5-लीटर पेट्रोल आणि तिसरे 1.5-लीटर डिझेल इंजिन देण्यात येणार आहेत. सर्व इंजिन बीएस 6 इमिशन नॉर्म पूर्ण करतात.
4 / 8
1.5 लीटरच्या पेट्रोल इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन स्टँडर्ड ठेवण्यात आले आहे. दोन्ही इंजिने अॅटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय असेल. 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड इंजिनसोबत 7 स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन मिळणार आहे.
5 / 8
किया सेल्टॉस एक कनेक्टेड कार आहे. यामध्ये UVO Connect नावाची कनेक्टिव्हीटी सिस्टिम आहे. ज्यामध्ये 5 कॅटेगरी आहेत. नेव्हीगेशन, सेफ्टी-सिक्युरिटी, व्हेईकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कन्व्हिनिअन्स अंतर्गत 37 फिचर्स देण्यात आले आहेत.
6 / 8
एआय आधारित वाहन चोरी, व्हॉईस कमांड, सेफ्टी अलर्ट आणि एअर प्युरिफायरसाठी रिमोट कंट्रोल, इंजिन स्टार्ट-स्टॉप आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.
7 / 8
या कारमध्ये टाटा हॅरिअरसारखे टरेन रिस्पॉन्स सिस्टिम देण्यात आली आहे. या कारमध्ये काही ड्रायव्हिंग मोड्स आहेत. यासोबत ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम ब्रेक असिस्ट, स्टॅबिलिटी कंट्रोल मॅनेजमेंट सारखे फिचर देण्यात आले आहेत.
8 / 8
या कारमध्ये टाटा हॅरिअरसारखे टरेन रिस्पॉन्स सिस्टिम देण्यात आली आहे. या कारमध्ये काही ड्रायव्हिंग मोड्स आहेत. यासोबत ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम ब्रेक असिस्ट, स्टॅबिलिटी कंट्रोल मॅनेजमेंट सारखे फिचर देण्यात आले आहेत.
टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सAutomobileवाहनTataटाटा