सणासुदीला भारतात लाँच होणार आहेत या कार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:38 PM2018-09-17T13:38:37+5:302018-09-17T13:49:57+5:30

देशात सध्या पाडवा, दिवाळी अशा सणांची मांदियाळी आहे. या सणासुदीचा काळ कॅश करण्यासाठी वाहन कंपन्या सरसावल्या आहेत. फोर्ड या अमेरिकन कंपनीची फिगो आणि अस्पायर ही कार नव्या रुपड्यामध्ये येणार आहे. ही कार पुढील महिन्यात लाँच होणार आहे. जुन्या कारच्या तुलनेत यामद्ये काही सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. ही कार सीएनजीमध्येही येऊ शकते. या कारमध्ये नवे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन असणार आहे.

भारतात सणासुदीला कार घेण्याचा प्रघात आहे. यामुळे या काळात कंपन्या मोठ्या प्रमाणावर डिस्काऊंटही देतात. तसेच कारही लाँच करतात. होंडा कंपनीने नुकतीच नव्या प्लॅटफॉर्मवरची अमेझ कार लाँच केली होती. आता होंडा आपली CR-V कारचे नवे जनरेशन लाँच करणार आहे. या कारमध्ये मॅन्युअल आणि अॅटोमॅटीक असे दोन्ही गिअप बॉक्स असणार आहेत.

देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी आपली सात सीटर कार अर्टिगाचे दुसरे व्हर्जन लाँच करणार आहे. ही कार आकर्षक रुप आणि सुविधांनी युक्त असेल. यामध्ये 1.5 लीटर पेट्रोल आणि 1.3 लीटर डिझेल इंजिन असेल.

प्रीमियम कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझ सी क्लासचे फेसलिफ्ट मॉडेल काही दिवसांत बाजारात उतरवेल. जादा पावरफुल इंजिन आणि आकर्षक रचना, सुविधा असणार आहेत.

ह्युंदाईची सर्वाधीक खपाची कार सँट्रोसारखीच नवी कार लवकरच लाँच होणार आहे. ही कार अल्टो के10 आणि रेनॉल्टच्या क्विडल टक्कर देईल. ही कार 1.0 पेट्रोल इंजिनसोबत येईल.