शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:40 IST

1 / 11
वाहन कंपन्यांकडे २०२४मध्ये उत्पादित केलेल्या ५०,०००हून अधिक न विकलेल्या कार असून, त्यांची एकूण किंमत ५,५०० कोटी रुपये इतकी आहे.
2 / 11
या कारचा स्टॉक कमी करण्यासाठी कार कंपन्या ग्राहकांना गेल्या वर्षी उत्पादित केलेल्या कारवर तब्बल ४ लाख रुपयांपर्यंत सूट देत आहेत.
3 / 11
भारतीय ऑटोमोबाइल कंपन्यांकडे सध्या ६ लाखांहून अधिक कारचा स्टॉक आहे. हा स्टॉक २ महिन्यांच्या किरकोळ विक्रीसाठी आवश्यक स्टॉकपेक्षा जास्त आहे. यातील ८ ते १० टक्के कार २०२४मध्ये तयार झाल्या आहेत.
4 / 11
श्रीमंतांच्या वाढत्या खरेदीमुळे यावर्षी लक्झरी ईव्ही विक्रीत ६६ टक्के वाढ झाली. यावर्षी २,०२७ लक्झरी ईव्हींची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी-मे महिन्यात १,२२३ लक्झरी ईव्ही विकल्या गेल्या.
5 / 11
२०२४मध्ये बाजारात आलेल्या ह्युंदाई आयोनिक ५ईव्हीवर ४ लाखांपर्यंतची सवलत आहे. फोक्सवॅगन तिगुआनच्या स्पोर्ट्स व्हर्जन कारवर २.०५ लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे.
6 / 11
१ लाख रुपयांपर्यंतची सवलत रेनॉल्ट, निसान, जीप, सिट्रोएन आणि स्कोडासारख्या ऑटोमोबाइल कंपन्या त्यांच्या कारवर देत आहेत. ७० हजार रुपये ते १ लाखांपर्यंतची सवलत टाटा मोटर्स टिआगो, पंच आणि कर्व्ह ईव्हीवर आहे.
7 / 11
कारविक्रीत ईव्हीचा वाटा (जानेवारी ते मे पर्यंतचा डेटा) २०२०-०.२%, २०२१-०.५%, २०२२-१.२%, २०२३-२.२%, २०२४-२.५%,२०२५-३.७%
8 / 11
, Ioniq 5 ला कंपनीने नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या प्लॅटफ़ॉर्मवर तयार केले आहे. हा प्लॅटफॉर्म स्वत:च्याच बॅटरी मॉड्यूल तंत्रज्ञानाचा वापर करतो, तसेच सध्याच्या कंपनीच्या अन्य ईव्ही कारपेक्षा कमी सुटे भाग वापरता येतात. यामुळे कमी उत्पादन खर्च आणि वेगाने उत्पादन करता येणार आहे.
9 / 11
Ioniq 5 च्या लाँचिंगनंतर Hyundai ला जागतिक ईव्ही बाजारात 10 टक्के हिस्सेदारी मिळवायचे आहे. 2020 मध्ये ह्युंदाई आणि कियासाठी हा आकडा 7.2% टक्के आहे. 2020 मध्ये या दोन्ही कंपन्यांनी मिळून 1 दशलक्ष ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री केली आहे.
10 / 11
एकदा चार्ज केली की ह्युदाईची आयोनिक 5 ही कार 480 kms चे अंतर तोडते. जे ह्युंदाईच्याच कोना ईव्हीपेक्षा 20 टक्के जास्त आहे. कोना इलेक्ट्रीक या आधी सर्वाधिक रेंज देणारी कार होती. Ioniq 5 ही कार सध्या दोन बॅटरी पर्यायात मिळणार आहे.
11 / 11
58-(kWh) आणि 72.6 kWh असे हे दोन पर्याय आहेत. 2021 च्या पहिल्या सहामाहीत ही कार रस्त्यावर दिसू लागणार असून काही निवडक विभागांत ही कार विकली जाणार आहे.
टॅग्स :carकारElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन