शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या ‘मेड इन इंडिया’ बाईकवर 1.30 लाख रुपयांचा डिस्काउंट; Hero च्या या बाईकशी स्पर्धा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:28 IST

1 / 6
लोकप्रिय टू-व्हिलर कंपनी कावासाकीने आपल्या सर्वात स्वस्त ऑफ-रोडर KLX 230 च्या किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. पूर्वी 3.33 लाख रुपयांना मिळणाऱ्या या बाईकची किंमत तब्बल 1.30 लाख रुपयांनी कमी केली आहे. म्हणजेच, आता ही बाईक 1.99 लाख रुपयांना(एक्स-शोरुम) मिळेल. किंमत कमी केल्यामुळे ही बाईक या सेगमेंटमधील Hero Xpulse 210 ला तगडे आव्हान देईल.
2 / 6
Kawasaki आता भारतातच KLX 230 ची निर्मिती करेल, ज्यामुळे कंपनीला या बाईकची किंमत मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत होईल. कंपनी म्हणते की, त्यात कोणतेही बदल केलेले नाहीत. बाईकचे इंजिन आणि इतर फिचर्स पूर्वीसारखेच राहतील.
3 / 6
‘मेड इन इंडिया’ कावासाकी KLX 230 मध्ये समोर टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन असेल. ही बाईक 21-18 वायर-स्पोक व्हील सेटअपवर चालते. यामुळे बाईकला 265 मिमीचा ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. बाईकमध्ये दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक मिळतात.
4 / 6
ही बाईक जुन्या पद्धतीच्या सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिनने सुसज्ज आहे. हे 233 सीसी इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह 18 बीएचपी आणि 18 एनएम टॉर्क जनरेट करते. बाईकचे इंजिन आणि सस्पेंशन सेटअप याला अतिशय सक्षम ऑफ-रोडर बनवते.
5 / 6
भारतात कावासाकी KLX 230 ची सर्वात जवळची स्पर्धक हीरो एक्सपल्स 210 आहे. 1.75 लाख रुपये एक्स-शोरुम किंमत असलेल्या एक्सपल्स 210 मध्ये लॉन्ग सस्पेंशन सेटअप मिळतो. याशिवाय, यात दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेकसह ड्युअल चॅनेल एबीएस आहे.
6 / 6
एक्सपल्समध्ये 210 सीसी, लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 24 बीएचपी आणि 21 एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिन स्पेसिफिकेशननुसार एक्सपल्स 210 केएलएक्स 230 पेक्षा अधिक शक्तिशाली आहे.
टॅग्स :Kawasaki Bikeकावासाकी बाईकbikeबाईकAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगhero moto corporationहिरो मोटो कॉर्प