नवीन जावा बघितली का? नाही ना...! चला सैर करूया...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 09:56 PM2018-11-18T21:56:23+5:302018-11-18T22:03:51+5:30

भारतीय मनांवर अधिराज्य गाजवलेल्या भन्नाट मोटारसायकल जावाने पुन्हा भारतात पाऊल ठेवले आहे.

रॉयल एनफिल्डच्या बुलेटला टक्कर देण्यासाठी जावाने एक नाही तर तीन खतरनाक लूक असलेल्या मोटारसायकल त्याही कमी किंमतीत आज लाँच केल्या आहेत.

सर्वात कमी जावा मोटारसायकलची किंमत 1.64 लाख, जावा 42 ची किंमत 1.55 लाख आणि फॅक्टरीमध्येच क्सटमाईज करता येणारी बॉबर मोटारसायकलला रावा पेराक असे नाव देत या मॉडेलची किंमत 1.89 लाख रुपये एक्स शोरुम एवढी ठेवण्यात आली आहे.

पेराक ही मोटारसायकल तर हार्ले डेव्हिडसनचा लूक देते. ही बाईक काही दिवसांनी उपलब्ध होणार आहे.

जावाच्या या पहिल्या दोन मोटारसायकलना 293 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे.

6 स्पीड गिअरबॉक्स आहे.

जावाला सिंगल चॅनल एबीएस असून वजन 170 किलो आहे. इंधन टाकी 14 लीटरची आहे.

जावा कंपनीने 105 शहरांमध्ये डीलरशिप सुरु केली असून बाईकची डिलिव्हरी पुढील वर्षीच्या जानेवारीपासून देण्यात येणार आहे.

जावा पेराकला जावा आणि 42 चेच इंजिन देण्यात आले असले तरीही मोठे बोअर आणि 332 सीसीची क्षमता असल्याने थोडी जादा ताकद निर्माण होते.

जावाच्या या भन्नाट मोटारसायकल महिंद्राच्या मध्यप्रदेशमधील प्रितमपूर येथील प्रकल्पामध्ये बनणार आहेत.