चिनी कंपनीनं पाकिस्तानात केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च; किंमत ऐकून डोक्यावर हात माराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 14:46 IST2025-05-17T14:43:42+5:302025-05-17T14:46:20+5:30

भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. भारतात अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात विक्रीला आणत आहेत. पाकिस्तानातही अलीकडेच सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली आहे. त्याची किंमत ऐकून तुम्हाला धडकी भरेल.

चिनी कंपनी इनवेरेक्सनं अलीकडेच पाकिस्तानात सर्वात स्वस्त इनवेरेक्स जियो ईव्ही कार लॉन्च केली आहे. ज्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ३५ लाख रूपये आहे आणि ही कार एकदा चार्जिंग केल्यास १४० किमी रेंज देते. इतकी रेंज भारतातील एक सामान्य इलेक्ट्रिक स्कूटरही देते.

आता पाकिस्तानच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल बोलायचं झाले तर, Inverex XiO ही एक कॉम्पॅक्ट 4-दरवाज्यांची इलेक्ट्रिक कार आहे ज्याचे XiO 140, XiO 220 आणि XiO 320 असे 3 प्रकार आहेत आणि त्यांची किंमत अनुक्रमे ३५ लाख, ४२ लाख आणि ५२ लाख रुपये आहे.

ही इलेक्ट्रिक कार वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह लॉन्च करण्यात आली आहे आणि त्यांची सिंगल चार्ज रेंज १४० किमी आणि २२० किमी ते ३२० किमी पर्यंत आहे. इन्व्हरेक्स XiO EV इलेक्ट्रिक हॅचबॅक डीसी फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च करण्यात आली आहे आणि तिची बॅटरी फक्त अर्ध्या तासात ३० ते ८० टक्के चार्ज होऊ शकते.

पाकिस्तानमधील ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असून त्यात रडार सिस्टम, स्मार्ट सुरक्षा वैशिष्ट्ये तसेच एक वर्षाचा मोफत विमा यासह येते. पाकिस्तानमध्ये भरपूर इलेक्ट्रिक कार विकल्या जातात.

अखेर पाकिस्तानात कारच्या किंमती इतक्या जास्त का असतात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु शेजारील पाकिस्तानात अल्टो कारची किंमतीही १२-१३ लाख पासून सुरू होतात. पाकिस्तानी चलन भारतीय चलनाच्या तुलनेत अत्यंत कमी दर आहे.

नुकतेच पाकिस्तानने भारताशी पंगा घेत जागतिक स्तरावर आपले हसू करून घेतले. त्यात तुर्की आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला साथ दिली. त्यामुळे नाराज भारतीयांना तुर्की, अझरबैझानवर बहिष्कार टाकला. त्यामुळे यात तुर्कीला ३ हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागले आहे.