Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:15 IST2025-12-10T16:11:24+5:302025-12-10T16:15:14+5:30
Massive Discount On SUV Cars: वर्षाअखेरीस जर तुम्ही नवीन एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. डिसेंबर महिन्यात अनेक प्रमुख ऑटो कंपन्या त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल्सवर आकर्षक ऑफर्स आणि भरघोस सूट देत आहेत.

स्कोडा कुशाक: स्कोडाची ही कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुरूवाती किंमत १० लाख ६१ हजार १०३ रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहकांना थेट ३ लाख २५ हजारपर्यंत सर्वाधिक सूट मिळत आहे.

होंडा एलिव्हेट: नवीन लाँच झालेली ही एसयूव्हीची सुरुवातीची किंमत ₹ १० लाख ९९ हजार ९०० (एक्स-शोरूम) आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहकांना १ लाख ७६ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

मारुती सुझुकी जिमनी: ऑफ-रोड सेगमेंटमधील लोकप्रिय जिमनी एसयूव्हीवर तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंत बचत करता येईल. याची किंमत ₹ १२ लाख ३२ हजार (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

फोक्सवॅगन टायगन : या जर्मन एसयूव्हीवर तुम्हाला ₹ २ लाखांपर्यंतची मोठी सूट मिळू शकते. बेस व्हेरिएंटची किंमत ₹ १० लाख ५८ हजार ३०० रुपये (एक्स-शोरूम) आहे.

निसान मॅग्नाइट: किफायतशीर कॉम्पॅक्ट एसयूव्हीपैकी एक असलेल्या या कारवर ₹ १ लाख ३६ हजारपर्यंतची बचत करण्याची संधी आहे. बेस मॉडेलची किंमत ₹ ७ लाख ५९ हजार ६८२ पासून सुरू होते.
















