Car Buying Guide for Salaried : तुमचा पगार किती? त्यानुसार कोणती कार घ्यायची, ते ठरवा... हिशेबाचा जबरदस्त फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 04:27 PM2023-03-22T16:27:57+5:302023-03-22T16:35:41+5:30

तुम्ही पगारदार असाल तर बँका काय हो, त्या तर तुम्हाला कर्ज द्यायला आणि व्याज घ्यायलाच बसलेल्या असतात. हप्ता भरता भरता तुमचे नाकीनऊ येतात त्याचे काय, नाही का...

घर किंवा कार खरेदी करताना खर्चाचा विचार नाही केलात तर डुबायला होते. कर्जासाठी कर्ज काढावे लागते. कारण हा खर्चच आयुष्यातील दुसरा सर्वात मोठा खर्च असतो. जर तुमच्या नावावर आधीच घर असेल किंवा त्याचे हप्ते सुरु नसतील तर तुम्ही कार घेण्याचा विचार करू शकता. परंतू त्यासाठी अंथरुण पाहून पाय पसरवायचे असतात...

जर तुम्हाला कार घ्यायची असेल आणि तुम्ही पगारदार असाल तर बँका काय हो, त्या तर तुम्हाला कर्ज द्यायला आणि व्याज लुटायलाच बसलेल्या असतात. हप्ता भरता भरता तुमचे नाकीनऊ येतात त्याचे काय, नाही का...

यामुळे सर्वात आधी तुम्ही कार खरेदी करताना तुमचे बजेट ठरवा. पगार असेल की उत्पन्न तुमचा घर खर्च किती आहे हे पहा. यामुळे तुम्हाला कोणती कार घ्यायचीय हे ठरविणे सोपे जाईल. तुम्ही ती किती फिरवणार हा दुसरा मुद्दा. परंतू तुमच्या बजेटमध्ये कोणती कार फिट बसते ते तरी कळेल.

नवीन कार खरेदी करताना तुम्ही खर्चाचा विचार करतच असाल. ते तुमचा वापर, इंधन प्रकार, मेन्टेनन्स, इन्शुरन्स, टायर आदी गोष्टींवर ठरते. हा झाला कार घेतल्यानंतरचा खर्च. यात अधून मधून टायर पंक्चर झाला, टायरमध्ये हवा भरायची की नायट्रोजन, कार धुण्याचे पैसे आदी खर्चही मोडतो.

१०-१२ हजार हप्ता तुम्हाला आधी दिसेल, तुम्हाला वाटेल की तो आपल्याला परवडेल. परंतू, नंतरचा जो खर्च असतो तो कुठून करणार. १०-१२ हजार मोजून महिनाभर कार अशीच दारात शोभेला तर नाही ना ठेऊ शकत. फायनान्सच्या दुनियेत दोन फॉर्म्युले आहेत, जे तुम्हाला कोणीच सांगणार नाही...

वर्षाच्या उत्पन्नाच्या निम्म्यापेक्षा जास्त खर्च हा कारवर होता नये. हा नियम नेहमी लक्षात असुद्या. जर तुमचे उत्पन्न १० लाख रुपये वर्षाला असेल तर तुमचे कार खरेदी करण्याचे योग्य बजेट हे ५ लाख रुपये असेल. ते ऑन रोड किंमतीचे असेल.

कार घेताना उत्पनाचा 20/4/10 फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा खूप जणांनी वापरलेला फॉर्म्युला आहे. कर्जावर कार खरेदी करताना त्याच्या किंमतीच्या २० टक्के डाऊनपेमेंट करावे. कर्ज फेडण्याचा अवधी हा ४ वर्षे असावा आणि मासिक हप्ता हा पगाराच्या १० टक्क्यंपेक्षा अधिक नसावा.

यानंतर तुमचा घरखर्च, मुलांचा शिक्षणाचा खर्च, नेहमीचा ऑफिसला ये-जा खर्च, मेडिकल आदी खर्च पगारातून वगळावेत. यानंतर जर रक्कम उरली तर ती तुम्ही इंधनासाठी, इन्शुरन्स, मेन्टेनन्ससाठी उरते का पहावी. कारचे मायलेज, तुमचा वापर आदी गोष्टी पहाव्यात त्यानंतरच नवी-जुनी कार घ्यावी.

टॅग्स :कारबँकcarbank