शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वस्तात खरेदी करा तुमची आवडती Royal Enfield बाईक; कंपनीने सुरू केली नवीन सेवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 7:09 PM

1 / 7
Royal Enfield Reown: देशातील तरुणांमध्ये आणि बाईकप्रेमींमध्ये Royal Enfield च्या बाईक्सची प्रचंड क्रेझ आहे. Royal Enfield च्या बाईक्स महाग असल्यामुळे अनेकजण जुन्या बाईक खरेदी करतात. त्यामुळे सेकंड हँड मार्केटमध्येही या बाईक्सची मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येते. हीच मागणी पाहता कंपनीने ‘रीओन’(Reown) नावाचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे.
2 / 7
काय आहे Royal Enfield Reown? ज्या ग्राहकांना नवीन बाईक परवडत नाही, त्यांच्यासाटी कंपनीने सेकंट हँड बाईकचा पर्याय उपलब्ध केला आहे. या नवीन उपक्रमात ग्राहकांना त्यांची रॉयल एनफिल्ड मोटरसायकल खरेदी किंवा विक्री करता येईल. यामुळे ग्राहकांना सूस्थितीत असलेली Royal Enfield ची बाईक अगदी सहज उपलब्ध होईल.
3 / 7
RE-OWN लॉन्चिंगबाबत रॉयल एनफिल्डचे सीईओ बी गोविंदराजन म्हणाले की, यातून ब्रँडबद्दलचा विश्वास वाढवणे, ग्राहकांना चांगली सुविधा देणे आणि परवडणाऱ्या किमतीत ग्राहकांना त्यांची आवडती Royal Enfield बाईक देण्यासाठी हा नवीन रिओन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
4 / 7
ऑनलाइन आणि ऑफलाइन सेवा मिळेल- Reon मॉड्यूल स्टोअरमध्ये आणि ऑनलाइन, दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. ज्या ग्राहकांना त्यांची एनफिल्ड विकायची आहे, ते ऑनलाइन फॉर्म भरुन त्यांच्या जुन्या मोटरसायकलची कोणत्याही स्टोअरमध्ये तपासणी करू शकतात.
5 / 7
बाइक्सच्या 200 पेक्षा जास्त चाचण्या केल्या जातील- कंपनी त्यांच्याकडे आलेल्या सेकंड हँड रॉयल एनफिल्ड बाईकच्या 200 हून अधिक तांत्रिक आणि यांत्रिक तपासण्या करेल. याशिवाय, खराब पार्ट बदलून नवे पार्ट टाकले जातील आणि वॉरंटीसह दोन बाईक सर्व्हिसिंगही दिली जाईल.
6 / 7
RE-OWN द्वारे बाईक विक्री करणार्‍या ग्राहकांना रु. 5000 किमतीचे आकर्षक लॉयल्टी लाभ मिळतील. ज्या ग्राहकांना रॉयल एनफिल्ड बाईक खरेदी करायची आहे, ते त्यांची जुनी बाईक आणू शकतात आणि योग्य किमतीत विकू शकतात.
7 / 7
रॉयल एनफिल्डने RE-OWN ग्राहकांना फायनान्स देण्यासाठी HDFC आणि IDFC सारख्या बँकांसोबत करार केला आहे. या नवीन उपक्रमाचे अधिक तपशील कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळू शकतील.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईकAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग