शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 15:12 IST

1 / 5
ट्रायम्फ ट्रायडेंट ६६० स्पेशल एडिशन लवकरच भारतात लाँच होणार आहे. ट्रायम्फने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेलवर या बाईकबाबत अधिकृत घोषणा देखील केली आहे.
2 / 5
ट्रायडेंट ६६० स्पेशल एडिशनमध्ये नवा रंग आणि काही आकर्षित फीचर्स पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बाईक कधी लॉन्च होतेय, अशी चाहत्यांना उस्तुकता लागली आहे.
3 / 5
ट्रायउंट ६६० मध्ये ड्युअल-चॅनेल एबीएस, कलर टीएफटी डिस्प्ले, ट्रॅक्शन कंट्रोल आणि रेन आणि रोड असे दोन राइड मोड्स आहेत. ट्रायम्फने त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे ८.५० लाख रुपये असण्याची अपेक्षा केली आहे.
4 / 5
बाईकमध्ये ६६० सीसी, इनलाइन-ट्रिपल इंजिन आहे जे जास्तीत जास्त ८० बीएचपी पॉवर आणि ६४ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
5 / 5
बाईकची डिझाइन ट्रायडेंट ६६० व्हेरिएंटच्या इतर मॉडेलसारखीच आहे. बॉडीवर्कच्या खाली एक ट्यूबलर स्टील फ्रेम देण्यात आली, ज्याच्या समोर ४१ मिमी शोवा यूएसडी आणि मागील बाजूस प्रीलोड अॅडजस्टेबल शोवा मोनोशॉक आहे.
टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन