By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:38 IST
1 / 4देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्रा आपल्या इलेक्ट्रिक कारवर मोठ्या सवलती देत आहे. मार्च महिन्यापुरता मर्यादित असलेल्या या ऑफरमध्ये काही इलेक्ट्रिक मॉडेल्सवर तब्बल 4 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. विशेषतः XUV400 या इलेक्ट्रिक SUV वर सर्वाधिक डिस्काउंट दिला जात आहे. महिंद्राच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमधील Mahindra XEV 9e, Mahindra BE 6 आणि Mahindra XUV400 EL Pro या मॉडेल्सवर या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.2 / 4Mahindra XEV 9e या इलेक्ट्रिक SUV वर सुमारे 1.4 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट दिला जात आहे. ही कार रिअर-व्हील ड्राइव्ह सिस्टीमसह उपलब्ध आहे. या कारमध्ये 59 kWh आणि 79 kWh असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. 59 kWh बॅटरी मॉडेल 227.97 bhp पॉवर जनरेट करते, तर 79 kWh बॅटरी मॉडेल 281.6 bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 21.90 लाख रुपये आहे.3 / 4Mahindra BE 6 या इलेक्ट्रिक SUV वर सुमारे 2 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे. या मॉडेलमध्ये देखील 59 kWh आणि 79 kWh बॅटरी पॅक मिळतात. 59 kWh मॉडेल 227.9 bhp पॉवर, तर 79 kWh मॉडेल 281.6 bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारची सुरुवातीची किंमत सुमारे 19.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.4 / 4Mahindra XUV400 EL Pro या इलेक्ट्रिक SUV वर सर्वाधिक म्हणजे 4 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. या कारमध्ये 34.5 kWh आणि 39.4 kWh असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. याची रेंज 359 किमी ते 456 किमी असून, ही कार 147.5 bhp पॉवर आणि 310 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 17.49 लाख रुपये आहे.